नगर शहरातील सुमारे 776 रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेचे बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट तयार करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याची शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केलेली होती त्यानंतर किरण काळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांची मुंबई इथे जाऊन भेट घेतलेली असून सुमारे 25 मिनिटे चर्चा करत पुरावे देखील सादर केलेले आहेत.
किरण काळे यांच्यासोबत यावेळी माजी नगरसेवक आणि ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे हे देखील उपस्थित होते . किरण काळे यांनी यासंदर्भात माहिती देताना , ‘ नगर शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेला निकृष्ट करण्यात आलेली कामे कारणीभूत असून शहरातील काही अधिकारी , ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणारे महापालिकेतील काही नगरसेवक , लोकप्रतिनिधी , राजकीय पुढारी यांनी चक्क बनावट गुणवत्ता प्रमाणपत्र जोडून खोटी कागदपत्रे तयार करत शहराला खड्ड्यात घालत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे ‘, असे म्हटलेले आहे.
किरण काळे पुढे म्हणाले की , ‘ नगरकर रोज जीव मुठीत धरत खड्ड्यातून प्रवास करतात . रस्ते नावाला देखील उरलेले नाहीत त्यामुळे अनेकांना अनेक आजार जडलेले असून नागरिकांना अक्षरश: नरक यातना सहन कराव्या लागत आहेत या सगळ्याचे मूळ 776 रस्त्यांच्या कामात झालेला भ्रष्टाचार हे असून शासकीय तंत्रनिकेतनच्या चौकशी अहवालामध्ये बनावट गुणवत्ता प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे देखील समोर आलेले आहे. असे होऊ नये महापालिका प्रशासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडित असलेल्या ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी लपवाछपवी करत त्यांना पाठीशी घालत आहे ‘, असे देखील म्हटलेले आहे.