तू माझ्याशी बोलत का नाहीस ? , काष्टीत अल्पवयीन मुलीला अडवलं अन..

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार श्रीगोंद्यात समोर आलेला असून तू माझ्याशी बोलत का नाहीस असा प्रश्न विचारत एका अल्पवयीन मुलीची छेड काढत भुसावळ येथील एका तरुणाने तिच्या हातावर कटर ब्लेडने वार करून तिला जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे. शुक्रवारी काष्टी येथे ही घटना एक तारखेला घडलेली आहे.

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पोक्सो तसेच इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून श्रीगोंदा पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. शाळेचा दिलेला अभ्यास करण्यासाठी मैत्रिणीच्या घरी जात असताना मुलीसोबत हा प्रकार घडलेला आहे.

पीडित मुलगी ही काष्टी येथील रहिवासी असून माध्यमिक शाळेत शिक्षण घेते. आरोपीने तिला रस्त्यात अडवत माझ्यासोबत बोलत का नाहीस असा प्रश्न विचारत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आणि त्यानंतर ब्लेडच्या साह्याने तिला जखमी करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेली मुलगी काकाच्या घरी गेली म्हणून त्याने पुन्हा तिला दमदाटी केलेली असून श्रीगोंदा पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत .


शेअर करा