बॉलिवूडच्या ‘ ह्या ‘ दिग्गज अभिनेत्याच्या मुलावर बलात्कार आणि गर्भपाताचा आरोप

  • by

बॉलीवूड गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरणी चांगलेच चर्चेत आले आहे अशातच मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये गुरूवारी अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय विरोधात बलात्कार, फसवणूक आणि जबरदस्ती गर्भपाताचा आरोप लावत एका अभिनेत्रीने तक्रार केली आहे .आरोपीने वर्ष २०१५ ते २०१८ पर्यंत लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत बलात्कार केला होता, असे या महिलेचे म्हणणे आहे. Mithun Chakraborty’s son charged with rape and cheating

उपलब्ध माहितीनुसार, तक्रार करणारी महिला हिंदी आणि भोजपुरी सिनेमात काम करत होती. २०१५ सालात ती आरोपी अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर मे २०१५ मध्ये आरोपीने त्याच्या फ्लॅटवर तिला काहीतरी नशेचे ड्रिंक दिल्यावर तिच्यावर बलात्कार केला. लग्नाचं आमिष दाखवून आरोपी अनेक वर्ष तिच्यासोबत बलात्कार करत राहिला.

पीडितेने पुढं सांगितलं की, रिलेशनशिपदरम्यान ती गर्भवती झाली होती. ज्यानंतर तिचा बळजबरीने गर्भपात करण्यात आला. पीडितेने जेव्हा आरोपीवर लग्नासाठी दबाव टाकला तर त्याने कथितपणे लग्नपत्रीका जुळत नसल्याचं कारण सांगितलं. त्यानंतर लग्नाचा विषय काढल्याने आरोपीच्या आईने पीडितेला धमकी दिली होती. ओशिवरा पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेतली आहे आणि तपास सुरू केला आहे.