नववधूच्या बॅगेत चक्क ‘ धोत्र्याची बोंडे ‘ , संशयास्पद हालचाली जाणवल्या अन..

शेअर करा

महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अद्भुत असा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरापासून जवळ असलेल्या एका तरुणासोबत घडलेला असून एका टोळक्याकडून तरुणाचे लग्न लावून देण्यात आले मात्र चारच दिवसात जिच्यासोबत लग्न लावले ती नवरी फरार झालेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , तक्रारदार युवक हा सुशिक्षित असून गडहिंग्लजमध्ये एका परप्रांतीय व्यावसायिकाकडे नोकरी करतो . त्याचे वडील सैन्य दलातून निवृत्त झालेले असून घरी दोन एकर बागायत , जमीन , बोअरवेल , बंगला , गाडी सर्व काही व्यवस्थित आहे मात्र सरकारी नोकरी नसल्याकारणाने त्याला मुलगी मिळण्यास अडचण येत होती त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयनानगर येथील एक स्थळ त्याला एजंटच्या माध्यमातून चालून आले. एजंटसोबत एक महिला आणि पुरुष होते ते या मुलीचे मामा आणि मावशी आहेत. मुलीची आई आजारी आहे असे सांगण्यात आले.

फिर्यादी तरुणाने यावर विश्वास ठेवला त्यानंतर लग्न जमवताना मुलीला दीड लाख रुपये रोख आणि पन्नास हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व इतर खर्च देऊन गडहिंग्लज इथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न देखील पार पडण्यात आले . लग्न होऊन घरी आल्यानंतर नवरी कुणासोबतच बोलत नसायची आणि तिच्या हालचाली देखील संशयास्पद वाटत असायच्या.

सासरच्या व्यक्तींनी नववधूची बॅग तपासणी केली तर त्यात दिला धोत्र्याच्या वनस्पतीची बोंडे आणि काही संशयास्पद वस्तू देखील सापडल्या . तिला विचारणा केली त्यावेळी तिने उडवाउडवीची उत्तरे देत कांगावा सुरू केला. वाद नको म्हणून घरची मंडळी देखील शांत राहिली . तिसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा घातली आणि दुसऱ्या दिवशी आई आजारी आहे असे म्हणत ती निघून गेली ती पुन्हा आली नाही. आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच तक्रारदार व्यक्तीने पोलिसात गुन्हा नोंदवलेला आहे.


शेअर करा