महाराष्ट्रात तब्बल ४१२ कोटी रुपयांची चोरी होण्यास अवघे काही मिनिट होते बाकी इतक्यात .. : कुठे घडला प्रकार ?

  • by

देशभरातील विविध ठिकाणच्या खातेदारांचा एटीएम कार्डसह बँक खात्याशी संबंधित डाटा मिळवून त्या माध्यमातून 412 कोटी रुपयांच्या ऑनलाईन चोरीचा प्रयत्न जळगाव पोलिसांनी हाणून पाडला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या विशेष निरीक्षणात रामानंद गनर पोलिसांनी इथिकल हॅकर मनीष भंगाळे याच्या मदतीनं अत्यंत अभ्यासपूर्ण तपास व चौकशी करुन सापळा रचून सायबर टोळीचा शहरात पर्दाफाश केला आहे. Due to the vigilance of the police, the theft of Rs 412 crore was saved

उपलब्ध माहितीनुसार, देशभरातील बिल्डर, उद्योगपती, राजकारणी, बड्या आसामींचे कोट्यवधी रुपये असलेल्या बँक खात्यांचे डिटेल्स चोरी झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या टोळीमधील आतापर्यंत नऊ संशयित पोलिसांना निष्पन्न झाले असून ते खान्देशासह इतर राज्यातील देखील आहेत तसेच बँक अधिकाऱ्यांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात दिसते आहे .

मुख्य संशयित हेमंत ईश्‍वरलाल पाटील (वय- 42, रा. भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजीनगर) व बांधकाम ठेकेदार मोहसीन खान ईस्माईल खान (वय-35, रा.देवपूर, धुळे) यांना जेरबंद करण्यात आले आहे तर आणखी देशभरातील विविध ठिकाणच्या सात संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधार्थ चार पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.

मनीष भंगाळे यानं माहिती पाठवलेल्या एका खात्यातून संशयित पाटील व खान यांच्या खात्यात 250 रुपयांप्रमाणे ट्रान्झॅक्शन केले. त्यामुळे 412 कोटी रुपयांचेही असेच ट्रान्झॅक्शन होईल, याची खात्री संशयितांना पटली. त्यानंतर भंगाळेच्या माध्यमातून पोलिसांनी पाटील व खान यास जळगाव शहरातील एकलव्य मैदानाजवळून बोलवले.

पोलिस दबा धरून बसलेले होते. तेथे येताच पोलिसांनी पत्रकार पाटील व बिल्डर खान याला अटक केली. त्यांच्याकडून मोबाइल, आरसीबूक, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तपासासाठी पोलिसांनी भंगाळे याचाही मोबाइल जप्त केला आहे. शुक्रवारी पोलिसांनी दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले. त्यांना 20 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.