बायकोच्या माहेरी येऊन तिचे ‘ जुने फोटो ‘ गावात दाखवून केली बदनामी : गुन्हा दाखल

  • by
चित्र : सांकेतिक

नगर जिल्हयातील संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे राहणाऱ्या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवाहितेने आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पती स्वप्निल सापन, सासरे प्रकाश सापनर, सासू संगीता सापनर ( राहणार नाशिक ) गोरक्षनाथ सापनर ,चुलत सासू प्रज्ञा सापनर, चुलत सासरे भागवत सापनर व चांगदेव सापनर (राहणार नाशिक ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. The wife’s husband came and showed her old photos in the village

उपलब्ध माहितीनुसार, विवाहिता तिचा पती सासू-सासरे व नणंद यांच्यासोबत नाशिक येथे राहत होती. काही दिवसापासून सातत्याने त्यांच्या घरात वाद सुरू होते त्यामुळे विवाहिता माहेरी निघून आली त्यानंतर सासरची मंडळी तिच्या घरी गेली आणि त्यांनी मोबाईल मधील जुने फोटो दाखवून माहेरच्या मंडळी समोर विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेतला.

यावेळी पती व त्या सोबत आलेल्या सासरच्या मंडळींनी माहेरच्या मंडळींना शिवीगाळ केली. ‘ जर नांदायला आली तर तिचा खून करू ‘अशी धमकी दिली.पती स्वप्नील सापनर याने पत्नीला नांदणार नसल्याची धमकी दिली तसेच पीडित महिलेचे फोटो गावात इतरत्र दाखवून तिची आणखी बदनामी केली. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर करत आहेत.