मुंबई पोलिसांकडून ‘ १२४ अ (राजद्रोह) ‘ गुन्हा दाखल होताच कंगना बावचाळली म्हणाली…

  • by

वांद्रे न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी अभिनेत्री कंगना राणावत आणि आणि तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी याबाबत माहिती दिली. सतत हिंदू आणि मुस्लीम या दोन समुदायांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल आणि जातीय सलोखा बिघडेल, अशा हेतुने वारंवार ट्वीट करत असल्याने अभिनेत्री कंगना राणावत व तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आज दिले होते. त्या आदेशानुसार कंगना व तिच्या बहिणीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. १२४ अ (राजद्रोह) यासह विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mumbai Police files Rajdroh case against Kangana Ranaut

बॉलीवूड मधील कास्टिंग डायरेक्टर मुनावरअली सय्यद यांनी ऍड. रवीश जमींदार यांच्यामार्फत दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार दिली होती. त्याविषयीच्या सुनावणीअंती न्यायाधीश जयदेव घुले यांनी सर्व ट्वीट्स पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी दखलपात्र गुन्हा दिसत असल्याचे निरीक्षण नोंदवून पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला.पालघरध्ये दोन साधूंची जमावाने हत्या केल्यानंतर त्यावर कंगनाने आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं. त्यानंतर मुंबई पालिकेने कंगनाच्या बंगल्यातील अतिक्रमण तोडले असता तिने ‘बाबर सेना’ असा उल्लेख करत ट्वीट केले होते. बॉलीवूडवरही अनेक वादग्रस्त ट्वीटची मालिकाच तिने लावली होती. या सर्वावर बोट ठेवत याचिकाकर्त्याने कारवाई करण्याची मागणी केली होती.

मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर कंगनाने त्यावरदेखील ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे, ” नवरात्रीचं व्रत कोण कोण करतंय? आज नवरात्रीच्या मुहूर्तावर काढलेले माझे फोटो पाहा. मी सुद्धा हे व्रत करत आहे. या सर्वात माझ्याविरुद्ध आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पप्पू सेनेला माझ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाहीय. मला जास्त मिस करताय तर मी लवकरच तिथे परतत आहे ” असं ट्वीट करत कंगनाने नवरात्रीचा मुद्दाम उल्लेख करत पुन्हा पोलीस कारवाईत देखील धर्म घुसडवला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कंगनाने एकेरी उल्लेख केला होता. मुंबई, महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांबद्दलही तिने आक्षेपार्ह विधाने केली होती. सातत्याने महाराष्ट्र सरकारला लक्ष करण्यासाठी कंगना, तिची बहीण रंगोली यांना पुढे करून विरोधकांकडून असे उद्योग केले जात आहेत . सुशांत सिंह प्रकरणात न्यायाची मागणी करणारी कंगना हाथरस प्रकरणाबाबत मात्र तेवढी आक्रमक दिसत नाही हे देखील सत्य आहे मात्र आता कोर्टाच्या आदेशाने वाचाळ कंगनावर गुन्हा दाखल करून तिला जेलची वारी घडवून आणावी अशी तमाम महाराष्ट्राची इच्छा आहे. स्वतःला झाशीची राणी म्हणणारी कंगना नवरात्रात अटक झाली तर स्वतःला तिने देवी म्हणू नये म्हणजे मिळवली.