… ‘ म्हणून ‘ दोन्ही सख्ख्या भावांनी एकत्र येत देहविक्रय करणाऱ्या तरुणीला संपवले : कुठे घडली घटना ?

  • by

देहविक्रय करणाऱ्या एका महिलेचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला होता मात्र काही तासांच्या आतच तिच्या मारेकऱ्यापर्यंत पोहचण्यास पोलिसांना यश आले आहे . भिवंडी शहरातील हनुमान टेकडी परिसरात ही घटना घडली होती. देहविक्रय करणाऱ्या 25 वर्षीय तरुणीची गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात ग्राहकांनी तिच्या राहत्या घरात हत्या केल्याची घटना घडली होती. सदर हत्येचा छडा लावण्यात भिवंडी शहर पोलिसांना चोवीस तासाच्या आत यश मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दोघांनी हत्येपूर्वी तरुणीवर बलात्कार केला नंतर तिची गळा आवळून हत्या केली. तरुणीच्या गुप्तांगाला देखील दोघांनी खून केल्यावर इजा पोहचवल्याचे निदर्शनात आले आहे . Two brothers murdered a prostitute in Bhiwandi

उपलब्ध माहितीनुसार, भिवंडीतील आसबीबी परिसरात असलेल्या हनुमान टेकडी या भागात राहणारी तरुणी देहव्यापार करत होती. गुरुवारी रात्रीच्या सुमाराला या मृत तरुणीच्या खोलीत तीन ग्राहक आल्याची माहिती समजल्यामुळे या अज्ञात ग्राहकांवर तिच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत होता. आरोपींनी देहव्यापार करणाऱ्या या तरुणीच्या गुप्तांगास इजा पोहोचवून तिची गळा आवळून हत्या केली होती.

पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ते दोघे आरोपी सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली. तसंच यामधील मोठ्या भावाचे मृत तरुणीसोबत एकतर्फी प्रेम होते मात्र देहविक्रय करत असल्याने ती त्याच्या प्रेमाला नकार देत होती. तर दुसरा आरोपी असलेल्या लहान भावाच्या बायकोशी मृत तरुणीचे किरकोळ भांडण झाले होते. या दोन्ही वादातून या दोघा सख्ख्या भावांनी मिळून त्या तरुणीच्या राहत्या घरात प्रवेश केला. तिच्यावर बलात्कार करून तिला इजा केली आणि नंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.

पोलिसी खाक्या दाखवताच दोघा भावांनी पोलिसांसमोर हत्येची कबुली दिल्याची माहिती भिवंडी झोनचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. या दोन्ही आरोपींना अटक केली असून मृत तरुणी व दोन्ही आरोपी हे एकाच समाजाचे आहेत, तर याप्रकरणी पुढील कारवाई भिवंडी शहर पोलिसांची सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.