नगर हादरले.. ‘ ह्या ‘ किरकोळ कारणावरून अल्पवयीन भावाने केला लहान बहिणीचा खून

  • by

नगर शहरात शनिवारी किरकोळ कारणावरून अल्पवयीन भावाने बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना केडगाव परिसरातील शाहूनगर येथे घडली आहे. घरात टीव्ही पाहण्यावरून दोघा बहीण भावामध्ये भांडण होऊन लहान बहिणीच्या डोक्यात हातोडा मारून भावाने तिचा जागीच खून केला. शनिवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. Murder of younger sister by younger brother for petty reasons kedgaon ahmednagar

रूपाली ( वय 9 काल्पनिक नाव ) असे मृत मुलीचे नाव आहे तर तिचा मोठा भाऊ राहुल ( वय 13 काल्पनिक नाव ) याने तिच्या डोक्यात हातोडा मारून तिचा खून केला. या घटनेबाबत माहिती समजतात कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शाहूनगर परिसरात राहणाऱ्या या भावंडांचे वडील हे एमआयडीसी येथील एका कंपनीत कामगार आहेत. शनिवारी संध्याकाळी आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते त्यामुळे घरात हे दोघेच होते. त्यांच्यात टीव्ही पाहण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर ही घटना घडली. राहुलने हातोडा मारल्याने अल्पवयीन बहिणीचा जागीच मृत्यू झाला

शेजार्‍यांना ओरडण्याचा आवाज आल्याने ही घटना समोर आली. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.