सीसीटीव्हीत कैद झालेल्या ‘ ह्या ‘ गोळीबाराचे रहस्य उलगडले.. धक्कादायक सत्य आले बाहेर

  • by

पुणे शहरातील व्यवसायिक मयुर हांडे यांच्यावर झालेल्या गोळीबाराचे रहस्य उलगडण्यात पुणे पोलिसांना यश आले असून अनैतिक संबंधाचा त्रास होत असल्याने मयुर हांडे याच्यावर गोळीबार करण्यासाठी तीस लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात वानवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. mystery of the shooting of Mayur Hande in Pune city has been revealed

उपलब्ध माहितीनुसार, मोहम्मदवाडी इथे 12 ऑक्टोबर रोजी मयुर हांडे यांच्यावर गोळीबार करण्याची घटना घडली होती सुदैवाने गोळी त्यांच्या गालाला चाटून गेली त्यामुळे त्यांचा जीव वाचला. या घटनेचा वानवडी पोलिसांनी 48 तासात तपास करून गोळीबाराचा गुन्हा उघडकीस आणला. राजेश भिकू पडवळ ( वय 25 राहणार गोर्हे तालुका हवेली ) आणि बाळासाहेब अनंत जाधव ( वय 52 राहणार हांडेवाडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सांगितले की यातील फिर्यादी मयुर हांडे यांचा ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे आहे. ते ट्रॅक्टर घेऊन मोहम्मद वाडी येथे आले असता त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. राजेश पडवळ याने गोळीबार करून हांडे यांना मारण्याची तीस लाख रुपयांची सुपारी घेतली होती . पडवळ हा इलेक्ट्रिशन आहे तर बाळासाहेब जाधव हे व्यवसायिक असून हांडे यांच्या वर्तनाचा जाधव यांना त्रास होत होता त्यामुळे त्यांनी पडवळाला सुपारी दिल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे.