फक्त दोनशे रुपयांवरून विद्यार्थाला जंगलात नेलं अन , व्हिडिओही केला व्हायरल 

शेअर करा

देशात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून उत्तर प्रदेशातील झाशी इथे अवघे दोनशे रुपये परत केले नाहीत म्हणून दहावीच्या एका विद्यार्थ्याला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आलेली आहे . धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार करणारा विद्यार्थी देखील त्याचा वर्गमित्र आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , रिसाला चुंगी जवळील एका जंगलात हा प्रकार घडलेला असून दोनशे रुपये परत केले नाहीत म्हणून एका व्यक्तीला आणि त्याच्या मित्राला जंगलात घेऊन जाण्यात आले आणि त्यानंतर लाठ्या काठ्या आणि बेल्टने मारहाण करण्यात आली. हतबल झालेला विद्यार्थी हात जोडून विनवणी करत होता मात्र आरोपींना त्याची दया आली नाही. पोलीस ठाण्यात गेला तर ठार मारून फेकून देऊ अशी देखील धमकी त्यास देण्यात आलेली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे सदर घटनेचा व्हिडिओ देखील आरोपींनी बनवला आणि तो परिसरात व्हायरल देखील केला. पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी विद्यापीठ चौकी पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केलेली आहे. विद्यार्थ्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार , मी त्यांच्यासमोर हात जोडून माफी मागत होतो मात्र तरी देखील त्यांना दया आली नाही. सुमारे तासभर ते मला मारहाण करत होते. आरोपींनी या प्रकाराचा व्हिडिओ देखील व्हायरल केल्यामुळे माझी बदनामी झालेली आहे असे देखील त्याने म्हटलेले आहे. 


शेअर करा