‘ चल झालं ब्रेकअप ‘ पण आधी जेवण चहा-कॉफी याचे पैसे टाक नाहीतर …: उच्च न्यायालयापर्यंत गेले प्रकरण

शेअर करा

दोघे एकमेकाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेम झाले आणि ते सोबत डेटिंगवर जाऊ लागले. यादरम्यान त्या प्रेमवीराने प्रेयसीवर चांगलाच खर्च केला मात्र काही कालावधीतच त्यांचे ब्रेक अप झाले आणि या तरुणाचा प्रेमभंग झाला. यामुळे या तरुणाने प्रेयसीकडून तिच्यासाठी डेटिंग आणि अन्य ठिकाणी फिरायला जाणे यावर केलेला खर्च मागण्यास सुरुवात केली. जेव्हा प्रेमिकेने त्याला नकार दिला तेव्हा त्याने तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली तसेच तिचे फोटो देखील सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रकरण पोलिसात आणि अखेर उच्च न्यायालयात गेले. As soon as there was a breakup in love, a young man from Gujarat started asking for money he made over girl

उपलब्ध माहितीनुसार, सदर प्रकरण सुरतच्या युगुलाचे आहे. 27 वर्षांचा तरुण आणि 21 वर्षांची तरुणी यांची दोन वर्षापूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती. दोन्ही मेहसानाच्या एकाच गावातील राहणारेआणि एकाच समाजाचे आहेत. या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले. याची सुरुवात एप्रिल 2018 मध्ये झाली आणि १० महिने अफेअर सुरु होते मात्र अखेर ब्रेक अप झाले.

एका खास कार्यक्रमात तरुणाने त्याच्या प्रेयसीला सोबत येण्याचा आग्रह केला होता. मात्र तिने परिक्षा असल्याचे सांगत नकार दिला होता. यामुळे नाराज झालेल्या प्रियकराने तिच्यासोबत वाद घालत प्रेमसंबंध संपविले. तरुणीने त्याच्याशी संपर्क तोडलेला पाहून त्याने तिच्यासोबत वाद घातला आणि धमकवायला सुरु केले यानंतर तरुणीने मार्च महिन्यातच पोलिसांकडे धाव घेतली होती व प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला होता.

तक्रारीमध्ये आरोप लावण्यात आला आहे की, प्रियकराने ब्रेकअप झाल्यानंतर तिच्याकडे 50000 रुपये परत करण्याची मागणी सुरु केली. तर तरुणाने हे पैसे तिला फिरविण्यासाठी, डेटवर, जेवण-नाष्ट्यामध्ये खर्च केले असे त्याचे म्हणणे आहे . प्रेयसीने विद्यार्थीनी असल्याने तिच्याकडे तेवढे पैसे नसल्याचे सांगत हे पैसे देण्यास नकार दिला होता. यावर त्या प्रियकराने तिला फोन करून शिवीगाळ आणि धमक्या देण्यास सुरुवात केली.

काही दिवसांनंतर तिला एक धमकीचा मेसेज आला. जर पैसे परत केले नाहीत तर तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणार असल्याचे त्यात म्हटले होते. यानंतर काही दिवस त्या तरुणीने फोन बंद ठेवला यानंतर पुन्हा सोशल मीडियावर संपर्क साधत तरुणीकडे त्या प्रियकराने तिच्याकडे 60000 रुपये मागितले.
अखेर या त्रासाला कंटाळून प्रेयसी पोलीस ठाण्यात गेली आणि गुन्हा नोंदविला. आता या तरुणाने हा गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये त्याने प्रेयसीने लावलेल्या आरोपांना फेटाळले आहे.


शेअर करा