पुणे हादरले…न्यायालयाच्या आवारातून अपहरण केलेल्या ‘ त्या ‘ वकिलाचा अखेर खून : काय आहे प्रकार ?

  • by

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून अपहरण केलेल्या वकिलाचा खून झाल्याचं उघड झालं आहे. उमेश चंद्रशेखर मोरे असं खून झालेल्या वकिलाचं नाव असून पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. उमेश मोरे यांची हत्या करून मृतदेह ताम्हिणी घाटात फेकला होता. Murder of lawyer Umesh Chandrasekhar More, who was abducted from a court premises in Pune

उपलब्ध माहितीनुसार, शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून 1 ऑक्टोबर रोजी वकील उमेश मोरे यांचं अपहरण झालं होत. सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेले उमेश मोरे संध्याकाळी घर न परतल्याने कुटुंबाने धावाधाव सुरू केली. तसंच मोरे यांच्या कुटुंबातील सदस्याने पुणे पोलिसात तक्रार दाखल केली.

दोन आठवडे उलटून गेल्यानंतर उमेश मोरे यांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना अपयश आलं होतं. त्यामुळे पुणे बार असोसिएशनच्या सदस्यांनी मागच्या आठवड्यात मंगळवारी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासमवेत बैठक घेतली. “आम्ही पोलिसांना उमेशचा शोध अधिक वेगवान करण्यासाठी विनंती केली आहे. पोलीस आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की आपण या प्रकरणात लक्ष घालू,” अशी माहिती पीबीएचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश मुळीक यांनी दिली.

त्यानंतर आता अखेर उमेश मोरे यांच्याबद्दल महत्त्वाचा खुलासा झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये कपिल विलास फलके, दीपक शिवाजी वांडेकर आणि रोहित दत्तात्रय शेंडे यांचा समावेश आहे. जमिनीच्या वादातून मोरे यांचा खून झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. खून, माऱ्यामाऱ्या असे प्रकार वारंवार समोर येत आहेत. त्यातच वकिलाचं थेट न्यायालयाच्या आवारातून अपहरण करून हत्या करण्यात आल्याने पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.