हत्येतील आरोपी महिलेवर पोलीस अधिकाऱ्यांनी कोठडीत १० दिवस सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप

शेअर करा

एका हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या महिलेवर पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याचे धक्कादायक आरोप सदर महिलेने केले आहेत. बातमी मध्यप्रदेशातील असून मध्य प्रदेशातील रीवा येथे कोठडीत पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी १० दिवस सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप हत्येतील आरोपी महिलेने केला आहे. मनगवा पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यावरही या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. A woman accused of murder has been accused of gang-raping her in police custody for 10 days

एका हत्या प्रकरणात ही महिला आरोपी असून, ती सध्या कोठडीत आहे. १० ऑक्टोबर रोजी तुरुंगातील कोठडीत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि वकिलांचे पथक गेले होते. त्यावेळी कोठडीत पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला. त्यानंतर न्यायाधीशांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत

पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, न्यायालयाकडून आदेशाचे पत्र मिळाले आहे. आरोप करणारी महिला ही हत्येतील आरोपी आहे. ९ मे ते २१ मे या दरम्यान पोलिसांनी कोठडीत बलात्कार केल्याचा तिने आरोप केला आहे. मात्र, या महिलेला २१ मे रोजी अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. मानगवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुधा वर्मा नावाच्या महिलेची हत्या झाल्यानंतर पाच दिवसांनी आरोपी महिलेला अटक केली होती, असे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पोलीस कोठडीत उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्याच्या प्रभारींसह पाच जणांनी बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने त्यावेळी विरोध केला, मात्र, तिच्या वरिष्ठांनी तिला दरडावले, असेही या महिलेने न्यायाधीशांसमोर सांगितले. तुरुंगात निरीक्षणासाठी गेलेल्या पथकातील वकील सतीश मिश्रा यांनी सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी तुरुंगातील वॉर्डनकडे यासंबंधी तक्रारही केली होती असा महिलेचा दावा आहे. वॉर्डननेही त्याला दुजोरा दिला आहे. तिच्या जबाबाच्या आधारे जिल्हा न्यायाधीशांनी १४ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यासह पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


शेअर करा