स्वतःच्या नवऱ्यावर बायकोने केली ॲट्रॉसिटी केस , नवरा गजाआड तर महिला म्हणतेय.. 

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या सोलापूर मध्ये समोर आलेले असून पती-पत्नीतील वादात पतीवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याचा प्रकार समोर आलेला आहे.  न्यायालयीन इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडलेली असून पीडित महिला ही मागासवर्गीय समाजाची आहे म्हणून तिचा जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करून आरोपीने तिचा छळ केला, असे तिचे म्हणणे आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , पंढरपूर येथील हे प्रकरण असून एका महिलेने तिच्या नवऱ्याच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत फिर्याद नोंदवलेली आहे . न्यायालयीन इतिहासात बायकोकडून स्वतःच्या नवऱ्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्याचा हा पहिलाच प्रकार असून आंतरजातीय विवाह केल्यानंतर त्यांच्यात वादावादीला सुरुवात झालेली होती . गुन्हा दाखल झाल्यानंतर पतीला अटक करण्यात आलेली आहे. 

फिर्यादी आणि आरोपी यांचा प्रेमविवाह झालेला होता फिर्यादी महिला ही अनुसूचित जातीतील आहे तर आरोपी नवरा हा सुवर्णकार समाजातील आहे . त्यांना दोन मुली देखील असून गेल्या काही दिवसांपासून पतीकडून जातिवाचक शिवीगाळ करून त्यांचा छळ केला जात होता सोबतच त्यांना मारहाण देखील केली जात होती असे फिर्यादी महिला यांचे म्हणणे आहे . आपली इच्छा नसताना आरोपीने आपल्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला असे देखील फिर्यादीचे म्हणणे असून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीस अटक केलेली आहे. 


शेअर करा