व्हायरल ऑडिओ : ” मी तुझ्या बापाचा नोकर नाहीये ” रात्री ९:३० ला फोन येताच वरूण गांधी भडकले

शेअर करा

उत्तर प्रदेश म्हणजे गुन्हेगारांसाठी सुवर्णभूमी झालेली असून गुन्हेगारांनी गुन्हे करायचे आणि राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना वाचवायचे असे समीकरणच बनले आहे. याच उत्तर प्रदेशमधील पीलभीतचे भाजपाचे खासदार वरुण गांधी यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये वरुण गांधी एका व्यक्तीवर भडकले आहेत. त्याने रात्री ९:३० वाजता मदतीसाठी फोन केला होता मात्र त्याचे बोलणे ऐकून घेण्याआधीच वरुण गांधी त्याला ” मी तुझ्या बापाचा नोकर नाहीय ” असे सुनावतात . तो व्यक्ती दारूची तस्करी करत होता. BJP MP Varun Gandhi gets angry over phone call at 9:30 pm pilbhit

व्हायरल ऑडिओमध्ये एका बाजुने वरुण गांधी बोलत असून दुसरा व्यक्ती ठाणा क्षेत्रात राहणारा सर्वेश नावाचा व्यक्ती आहे. ”मी तुझ्या बापाचा नोकर नाहीय”, अशा शब्दांत गांधी यांनी दारु तस्कराला सुनावले आहे. सर्वेशच्या घरावर रात्री पोलिसांनी छापा मारला होता. त्याच्या घरामध्ये अवैधरित्या दारुचा साठा मिळाला होता. तो घरातून दारू विकत होता.यानंतर पोलिसांनी कारवाई करत सर्वेशला ताब्यात घेतले. तसेच त्याला सुनगढीच्या आसमरोड पोलीस ठाण्यामध्ये घेऊन आले.

सर्वेशला इथे आणल्यानंतर सर्वेशने रात्री ९:३० वाजता खासदार वरुण गांधी यांना फोन केला. यावेळी वरुण गांधी यांनी त्याला चांगलेच झापले. या प्रकारचा ऑडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. आता हा ऑडिओ पोलिसांनी किंवा सर्वेशने व्हायरल केला की वरुण गांधी यांनी हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही.

वरुण गांधी यांचा हा ऑडिओ व्हायरल होताच समाजवादी पक्षाचे नेते सुनिलसिंह यादव यांनी वरुण गांधी यांच्यावर टीका केली आहे. यादव यांनी ट्विट करून सांगितले की, ” वरुण गांधी जनतेला सांगत आहेत की, मी तुमच्या बापाचा नोकर नाहीय. वरुणजी गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने सांगितले की, सरकार जनतेची सेवक असते शासक नाही. मात्र, सामंतवाद भाजपाची परंपरा आहे. मागास जातीचे लोक तुमच्यासाठी साप- उंदरासारखे आहेत. आता कोण कोणाचा बाप आणि कोण नोकर याचे उत्तर तुम्हाला जनताच देईल ” , असे म्हटले आहे.

दुसरीकडे ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी वरुण गांधी यांच्या विरोधात भूमिका मांडली आहे, तर सदर इसम हा दारू तस्कर होता त्यामुळे वरुण गांधी यांची बाजू घेतानाही बरेचजण दिसत आहेत. वरुण गांधी यांनी दारु तस्कराची मदत केली नाही, असे म्हणत काहीजण वरुण गांधी यांचे समर्थन करत आहेत मात्र व्हायरल ऑडिओमध्ये मात्र वरुण गांधी यांनी त्याचे बोलणे ऐकून न घेताच आधीच ” बापाचे नोकर ” ची भाषा वापरल्याचे देखील दिसते आहे .


शेअर करा