भाषण सुरु असताना शेतकऱ्याचा मृतदेह पडून होता आणि निर्लज्ज भाजप नेते टाळ्या वाजवत होते …

शेअर करा

पोटनिवडणुकीसाठी भाजपचा जोरदार प्रचार सुरु असतानाच सभेत आलेल्या एका शेतकऱ्याने खुर्चीवरच प्राण सोडला मात्र तरीदेखील ही सभा रद्द करण्याचे औदार्य भाजपने दाखवले नाही उलट त्या शेतकऱ्यासाठी दोन मिनिटाचे मौन बाळगून पुन्हा भाषणाला सुरुवात करण्यात आली.घटना मध्य प्रदेशातील असून २८ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी सुरु असलेल्या प्रचारादरम्यान घडली आहे. Though a farmer was died at a BJP rally in Madhya Pradesh, BJP leaders were applauding

उपलब्ध माहितीनुसार, खंडवा जिल्ह्यातील मंधाता विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अशाच एका जाहीर प्रचारसभेत एका शेतकऱ्याचे निधन झाले. पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे हे पोहोचणार होते. शिंदे येण्यापूर्वी स्थानिक नेत्यांची भाषणं सुरू होती. यादरम्यान पंधाना येथील भाजपचे आमदार राम दांगोरे भाषण देत असताना तिथे उपस्थित असलेले ८० वर्षीय शेतकरी जीवनसिंह यांचे निधन झाले.

शेतकऱ्याच्या निधनानंतर जवळच्या खुर्च्यांवर बसलेले नागरिक पांगले मात्र तरीही नेत्यांची भाषणं सुरूच होती. पोलिसांनी शेतकऱ्याच्या तोंडावर कपडा टाकला आणि भाषण पूर्ण होऊ दिले मात्र थोड्या वेळाने ज्योतिरादित्य शिंदे जाहीर सभेत पोहचण्यापूर्वी शेतकऱ्याचा मृतदेह सभेतून हलवण्यात आला. ज्योतिरादित्य शिंदे यांना शेतकर्‍याच्या निधनाची माहिती मिळाली. यावेळी शिंदे यांनी शेतकऱ्याला श्रद्धांजली वाहून एक मिनिट मौन पाळलं आणि त्यानंतर भाषणाला सुरवात केली.

जीवन सिंह हे देखील भाजपाचे जुने कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जातंय. पण करोना संसर्गामुळे गर्दीच्या ठिकाणी ज्येष्ठ आणि वृद्ध नागरिकांना जाण्यास मनाई आहे. मग त्यांना सभेत येण्याची परवानगी कशी काय मिळाली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सभेत शेतकऱ्याचे निधन होऊनही दुर्लक्ष करून सभा सुरू ठेवल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. शेतकर्‍याच्या निधनानंतरही जाहीर सभा का सुरू ठेवण्यात आली? असा प्रश्न करत कॉंग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.

मध्य प्रदेश कॉंग्रेसने यासंदर्भात ट्विट केलं आहे. ‘भाजपच्या कार्यक्रमात शेतकऱ्याचे निधन होऊनही नेत्यांची भाषणबाजी सुरूच होती. जाहीर सभेत शेतकऱ्याचे निधन होऊनही भाजप नेत्यांनी कार्यक्रम थांबवला नाही. शेतकऱ्याचा मृतदेह पडून होत आणि निर्लज्ज भाजप नेते टाळ्या वाजवत होते. शिवराजसिंह चौहान साहेब जनतेला नाही पण देवाची तरी भीती बाळगा’, असं ट्विट करत काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे.


शेअर करा