बिहारमध्ये मते मागायला जाताच भाजपच्या उमेदवारावर ‘ जोरदार शेणफेक ‘, आली पळून जाण्याची वेळ ..

शेअर करा

भाजपच्या बोलबच्चनगिरीचा आता लोकांना अक्षरश: वैताग आलेला असून फक्त नवीन घोषणा आणि अवघड असलेले विषय दिसताच वेगळे विषय उकरून काढण्याचे टेक्निक आता लोकांच्या देखील लक्षात आले आहे. बिहार निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजपला निवडणूक जड जात असल्याचे चित्र आहे . भाजपचे उमेदवार आणि बिहार सरकारचे कामगार संसाधन मंत्री विजयकुमार सिन्हा यांना प्रचाराला गेले असता लोकांनी चक्क शेण फेकून मारले आणि मुर्दाबादच्या घोषणा देत ग्रामस्थांनी मंत्र्याचा निषेध सुरू केला.त्याचा आवेग पाहता सिन्हा यांच्यावर चक्क पळून जाण्याची वेळ आली. In Bihar, it was time for the BJP candidate to flee as villagers threw dung on him lakhisray vijaykumar sinha

उपलब्ध माहितीनुसार, ग्रामस्थांनी केलेला विरोध आणि व्यक्त केलेला संताप पाहून मंत्री आल्या पावली पळून गेले. सोशल मीडियावर मंत्र्यांवर शेण फेकतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.लखीसराय विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आणि बिहार सरकारचे कामगार संसाधन मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात असताना हलसीच्या तरहारी गावात मतं मागण्यासाठी गेले होते. मात्र गावात प्रवेश करताच सिन्हा यांच्या विरोधात ग्रामस्थांनी घोषणा देण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यावर शेणाचा वर्षाव केला

संतप्त झालेल्या लोकांनी मुर्दाबादच्या घोषणा देत विजयकुमार सिन्हा यांना आपल्या पावली परत फिरण्याचा इशारा दिला त्यानंतर त्यांनी लोकांना शांत करण्याचा सिन्हा यांनी प्रयत्न केला मात्र अचानक लोक त्यांच्यावर शेण फेकू लागले. यानंतर विजयकुमार सिन्हा यांच्यावर चक्क पळून जाण्याची वेळ आली.विजयकुमार सिन्हा यांनी काहीही काम केलेलं नाही असं असताना हे मंत्री महाशय कोणत्या तोंडाने मतं मागण्यासाठी आले असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे. तर सिन्हा यांनी हा विरोधकांचा कट असल्याचा आरोप केला आहे.

विजयकुमार सिन्हा यांनी या विषयावर बोलताना , “अशा प्रकारची कृत्ये असामाजिक तत्व करत असतात. त्यासाठी ते अशी योजना आखतात. मात्र जनता आमच्या सोबत आहे. जनता एनडीएची विकासकामे पाहत आहे. याच कारणामुळे विरोधक घाबरले आहेत” असं म्हटलं आहे. बिहारमध्ये पुराच्या वेळी महाशय कुठे दिसले नाहीत, मोदींच्या मनमानी लॉकडाऊनने हजारो किलोमीटर पायी चालण्याची वेळ आली तेव्हा कुठे गायब होता ? असे देखील लोकांनी म्हटल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे .


शेअर करा