देशात एक विचित्र प्रकरण सध्या समोर आलेले असून प्रेयसीच्या मदतीसाठी केलेला एक प्रकार एका तरुणाला चांगलाच अंगलट आलेला आहे . पंजाबच्या फरीदाबाद येथील ही घटना असून प्रेयसी देत असलेली परीक्षा स्वतः देण्यासाठी तिचा मित्र प्रेयसीसारखा पेहराव करून परीक्षा केंद्रावर गेलेला होता मात्र त्याला पकडण्यात आलेले आहे.
आरोग्य विभागातील एका पदासाठी या तरुणाची प्रेयसी परीक्षा देणार होती मात्र तिला पेपर अवघड जाईल याचा अंदाज असल्याने प्रियकराने यासाठी व्यवस्थित अभ्यास करून स्वतःच परीक्षा देण्याचे ठरवले आणि प्रेयसी सारखे कपडे घातले . टिकली लावली , लिपस्टिकही लावली आणि बांगड्या घातल्या आणि त्यानंतर ओळखपत्र म्हणून खोटे आयडी कार्ड आणि आधार कार्ड देखील त्याने बनवून घेतले होते.
अंग्रेज सिंग असे या प्रियकराचे नाव असून त्याची प्रेयसी परमजीत कौर हिच्यासाठी त्याने हा सर्व प्रकार केलेला होता . परीक्षा केंद्रावर तो आला आणि त्याला बायोमेट्रिक डिवाइस मध्ये फिंगरप्रिंट देण्यात सांगितले त्यावेळी त्याचा हा बनाव लक्षात आला आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले सोबतच त्याची प्रेयसी परमजीत हिचा परीक्षेचा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे.
फरिदकोटच्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडलेला असून अंग्रेज सिंग हा प्रेयसीचे रूप घेऊन अधिकाऱ्यांना बनवण्याचा प्रयत्न करत होता मात्र परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्याचे बिंग फुटले. प्रियकराने केलेली आगळीक त्याच्या प्रेयसीला चांगलीच महागात पडलेली असून दुर्दैवाने तिला या परीक्षेला बसता आलेले नाही .