काय चोरलं हे महत्वाचं नाही ‘ कुठून चोरलं ‘ हे महत्वाचं, पोलिसही गेले चक्रावून…

शेअर करा

नागपुरात पोलिसांनी नुकतीच एका चोराला अटक केली होती. २० टन लोखंड असलेल्या ट्रकची चोरी केल्यावरून या चोराला पकडले होते. जामिनावर सुटताच त्या चोराने चक्क पोलीस स्टेशनच्या आवारातून जप्त केलेल्या त्याच ट्रकची चोरी केल्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. याच चोरांकडून हा ट्रक जप्त करून पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये उभा केला होता. जामिनावर सुटताच त्याच चोराने चक्क पोलीस स्टेशनच्या आवारातून ट्र्क लंपास केला. The confiscated track was snatched again by the thief from the police station in nagpur lakadganj

उपलब्ध माहितीनुसार, संजय ढोणे असं ट्रक चोरणाऱ्या चोरट्याचं नाव आहे. 9 ऑक्टोबर रोजी सुमित पोद्दार या लोखंड व्यापाऱ्याचा 20 टन लोखंड लादलेला ट्रक लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुष्करणा भवन समोरून याने चोरला होता. लाखोंचा मुद्देमाल भर रस्त्यातून चोरीला गेल्यामुळे पोलिसांनी चारही दिशेने पथक रवाना केले होते. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर यासाठी पोलिसांनी सूत्रे हलवली होती.

गुन्हे शाखेच्या पथकाने मोर्शीवरून तो ट्रक जप्त करून संजय ढोणे नावाच्या आरोपीला अटक केली होती. जप्त केलेला ट्रक आणि आरोपी लकडगंज पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले होते. याच चोराकडून आणखी काही मुद्देमाल जप्त करायचे आहे, असे सांगून पोलिसांनी जप्त केलेल लोखंड आणि ट्रक व्यापाऱ्याला परत केले नाही आणि सदर ट्रक हा पोलीस स्टेशनच्या आवारात पार्क केला होता .

दरम्यानच्या काळात न्यायालयातून चोरट्याला जामीन मिळाला आणि त्याने लकडगंज पोलीस स्टेशनच्या अगदी समोर उभा असलेला तोच ट्रक पोलिसांच्या ताब्यातून पुन्हा चोरून नेला आहे. लवकरच आम्ही चोरट्याला जेरबंद करू, असे नागपूर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.


शेअर करा