एकनाथ खडसेंपाठोपाठ मुलगी रोहिणी खडसे यांचाही भाजपाला ‘ गुड बाय ‘ म्हणाल्या की …

शेअर करा

एकनाथ खडसे यांनी भाजपामधून सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केल्याने राज्यात राजकीय भूकंप आला आहे. एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान एकनाथ खडसेंपाठोपाठ त्यांची कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही भाजपामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. After Eknath Khadse, daughter Rohini Khadse also gives ‘good bye’ to BJP

“मी देखील सक्रिय राजकारणात असून आता भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे काम करणार आहे. विधानसभा निवडणुकीत आपला पराभव करण्याचा प्रयत्न झाला. याचे पुरावे देऊनही कोणती कारवाई करण्यात आली नाही,” असा धक्कादायक आरोप रोहिणी खडसे यांनी भाजपावर केला आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असले तरी खासदार असणाऱ्या त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे मात्र भाजपातच राहणार आहेत. एकनाथ खडसे यांनीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान रक्षा खडसे यांनी एबीपी माझाशी बोलताना खडसेंच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

रक्षा खडसे या विषयावर बोलताना म्हणाल्या, “आजचा दिवस अत्यंत दुखाचा आहे. बाबांनी जो निर्णय घेतला त्याचं दु:ख मलाही आहे. पण तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. मी भाजपाकडून निवडून आली आहे. लोकांनी मला भाजपा उमेदवार म्हणून निवडून दिलं आहे. मी पक्षाचं काम करणार असून पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार. बाबांनी ४० वर्ष पक्षात घालवली. पण व्यक्तिगत कारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला”.

पुढे त्या म्हणाल्या , “पक्षाने दिलं हे त्यांनीही मान्य केलं आहे. पक्षासोबत त्यांचंही योगदान आहे. जेव्हा आपण व्यक्ती म्हणून काम करतो तेव्हा योगदान महत्त्वाचं असतं. नाथाभाऊंनी कधीही माझ्यावर मी सांगेन तसं करायचं असा दबाव टाकला नाही. त्यांनी संस्कार, शिकवण दिली. जनतेची सेवा करण्यासाठी मी राजकारणात आले आणि तीच सेवा आज भाजपाच्या माध्यमातून करत आहे. त्यामुळे माझ्यावर कोणताही दबाव नाही,”


शेअर करा