इंडोनेशियावरून आलेली ‘ गर्लफ्रेंड ‘ गायब होताच पोलिसही लागले कामाला मात्र ‘ वेगळीच ‘ भानगड आली समोर

शेअर करा

इंडोनेशियावरून आलेली क्रिस्ती नावाची तरुणी चक्क रायगड जिल्ह्यातील पडघवली येथून रविवारी (दि.18) रात्री आठच्या सुमारास बेपत्ता झाल्याची तक्रार पाली पोलीस स्थानकात आली. ही तरुणी पुण्याला आपल्या मित्राला भेटायला निघाली असल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटले होते. सुधागड तालुक्यातील व जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी तरुणीचा कसून शोध घेतला मात्र ती तरुणी आढळून आली नाही. The news of the disappearance of his girlfriend from Indonesia turned out to be false in raigad pali

उपलब्ध माहितीनुसार, सदर तरुणीचा मित्र सुरजप्रकाश विनोदकुमार दिवेली (वय. 28 राहणार मगरपट्टा सिटी हडपसर, पुणे ) याने क्रिस्ती (त्याची मैत्रीण ) हरवली असल्याची खबर मंगळवारी (ता.20) दुपारी पाली पोलीस स्थानकात दिली. ‘क्रिस्ती अजलेना दशेरा (वय 27 राहणार इंडोनेशिया ) ही उबेर टॅक्सीने पुण्याकडे निघाली होती. उबेर टॅक्सीवाल्याने आपण मगरपट्टा पुणे येथे पोहचलो आहोत असे सांगून क्रिस्ती हिला सुधागड तालुक्यातील पडघवली येथे मी सोडले होते असे सांगितले मात्र त्यानंतर क्रिस्ती कोणालाही दिसली नाही,’ असं आपल्या फिर्यादीत सूरजप्रकाश याने सांगितलं.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी आपली सूत्रे हलवली आणि तिचा शोध सुरु केला मात्र अखेर ती सापडली नाहीच मात्र या तरुणीने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलीस व तिच्या मित्राला चांगला गुंगारा दिला आणि अखेरीस ती इंडोनेशियातच असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.उबेर टॅक्सीवाल्याचा देखील पोलीस सध्या शोध घेत आहेत.

पोलीस तिच्यापर्यंत पोहचले देखील मात्र .. ?

पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी सांगितले की तक्रारीत नमूद इंडोनेशियातील कथित बेपत्ता तरुणीच्या मोबाईल लोकेशनच्या सहाय्याने आम्ही कसून शोध घेतला. त्यानंतर आम्ही मोबाईल संदेशाद्वारे तिच्याशी संपर्क साधला असता प्रारंभी सदर तरुणीने मी क्लिनिकमध्ये उपचार घेत असल्याचे सांगितले मात्र त्यादृष्टीने तपास सुरु केला असता ती तरुणी भारतात नव्हे तर इंडोनेशियामध्ये असल्याचे निष्पन्न झाले. मुंबई एअरपोर्टला चौकशी केल्यावर अशा नावाची कोणी व्यक्ती इंडोनेशियावरून भारतात आलीच नाही, असं सांगण्यात आल्याने सदर युवकालाच काय पण पोलिसांना देखील त्या युवतीने चांगलेच दमवल्याचे उघड झाले आहे.


शेअर करा