सॉफ्ट ड्रिंकची धुंदी उतरताच ‘ तिच्या ‘ लक्षात आले की आपण बारच्या माळ्यावर असून…..?

शेअर करा

पतीपासून विभक्त असलेल्या एका महिलेने कॅफे आणि बार मालक असलेल्या व्यक्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला असून ही घटना नागपूर शहरातील आहे. तक्रार करणारी महिला 38 वर्षाची असून त्रिमूर्ती नगर मध्ये राहते तर आरोपी याचे वय ५७ वर्षे असून तो गोकुळ पेठेत राहतो. Hotel bar owner charged with rape in Nagpur

उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला ही ब्युटी पार्लरमध्ये काम करते. 2007 मध्ये तिची आणि त्याची ओळख झाली होती. त्यानंतर तिने 2019 मध्ये एका मैत्रिणीसोबत गोकुळ पेठ येथे ब्युटी पार्लर टाकले त्यानंतर ती तिच्या मैत्रिणी सोबत आरोपीकडे गेली. त्यानंतर त्यांची सलगी वाढली. मार्चमध्ये त्याने तिला आपल्या कॅफेमध्ये बोलावले आणि तिला सॉफ्ट ड्रिंक पिण्यास दिले. ते पिल्यानंतर पीडित महिलेला गुंगी आली आणि त्यानंतर जेव्हा ती शुद्धीत आली तेव्हा ती वरच्या माळ्यावर बार मालकासोबत विवस्त्र अवस्थेत असल्याचे तिच्या लक्षात आले.

आरोपीने यावेळी तिला लग्न करणार असल्याचे तसेच तुझ्या दोन्ही मुलांचा सांभाळ करणार असल्याचे वचन दिल्यामुळे पीडिता शांत राहिली आणि पोलिसांकडे तक्रार केली नाही. त्यानंतर त्याने तिला मुंबईला नोकरीचे आमिष दाखवून दिले आणि तिथे एका हॉटेलमध्ये रात्रभर त्याने तिच्यावर अत्याचार केले मात्र काही कालावधी जाताच तो आपली फसवणूक करतो आहे. त्याने नोकरीही दिली नाही आणि लग्न देखील असे कोणतेच वचन पाळले नाही हे पिडीतेच्या लक्षात आले.

तिच्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर अंबाझरी पोलिसांनी आरोपी बार मालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने आपले नको ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली असाही आरोप तक्रार करणाऱ्या महिलेने दिला आहे केला आहे. या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे देखील पीडित महिलेचे म्हणणे आहे.


शेअर करा