लंडनचा नवरदेव म्हणताच ‘ ती ‘ झाली होती पागल मात्र त्याच्या डोक्यात होता मास्टरप्लॅन : पुढे काय घडले ?

शेअर करा

विवाह नोंदणीच्या संकेतस्थळावरून लंडनच्या तरुणाशी तिची ओळख झाली होती. त्याच्याशी ओळख झाल्यानंतर तिचे आयुष्यच बदलून गेले. हळूहळू या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले त्यानंतर त्या तरूणाने तिला लग्नाची मागणी घालण्यासाठी मी भारतात येत असल्याचे सांगताच तरुणीच्या आनंदाला भरते आले तिने ही गोष्ट कुटुंबीयांच्या कानावर घातली. A young woman was cheated of Rs 6.5 lakh by claiming to be the groom from London

मुलीच्या घरातून देखील विवाहास होकार आल्याने मुलीचा आनंद द्विगुणित झाला आणि ती त्याच्याबरोबर लग्नाचे स्वप्न रंगवू लागली. काही दिवसानंतर त्या तरुणाने आपण भारतात आलो असून मला दिल्ली पोलिसांनी पकडले आहे. मी सध्या विमानतळापासून असून मला पैशाची अत्यंत गरज असल्याचे सांगून तरुणीकडून साडेसहा लाख रुपये उकळले. हा धक्कादायक प्रकार मुंबईतील सांताक्रुजमध्ये उघड झाला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सांताक्रुज परिसरात 37 वर्षीय नोकरदार महिला राहण्यास आहे. 15 सप्टेंबर रोजी एका संकेतस्थळावरून लंडन येथील मोहम्मद जानसेना इब्राहिम नावाच्या एका तरुणासोबत तिची ओळख झाली होती. ( अवघ्या १४ दिवसात ) त्याने 29 सप्टेंबर रोजी मी भारतात तुझ्यासाठी लग्नाची मागणी घालण्यासाठी येत असल्याचे सांगितले. दिल्लीत आल्यानंतर तुला फोन करेल असे तो म्हणाला होता.

त्यानंतर त्याच्या फोनची सदर तरुणी वाट पाहत होती अशातच एका अनोळखी व्यक्तीने कॉल करून ज्यांचे त्याच्याकडील कार्डची गडबड झाल्याने त्याला पकडून ठेवल्याचे सांगितले आणि त्याला सोडवण्यासाठी पंचेचाळीस हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार सदर महिलेने पैसे भरले. पुढे त्या तरुणाने मी 70000 पौंड अवैधरित्या भारतात आणल्याचे सांगून आणखीन चार लाख पन्नास हजार रुपये भरण्यास सांगितले.

महिलेकडे इतके पैसे नव्हते त्यामुळे तिने दागिने गहाण ठेवून त्याला पैसे पाठवले. पुढे आणखीन एक-दोन नवीन कारणे शोधत त्याने त्या महिलेकडून एकूण साडेसहा लाख रुपये उकळले आणि त्यानंतर मात्र तो नॉट रिचेबल झाला. यात फसवणूक झाल्यानंतर अखेर त्या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्या विरोधात तक्रार दिली.


शेअर करा