आईवर हाथ उचलणाऱ्याचा मुलाने क्रौर्याच्या सर्व ‘ मर्यादा ‘ ओलांडत केला खून : कुठे घडली घटना ?

शेअर करा

आईला झालेल्या मारहाणीचा मुलाच्या मनावर गंभीर परिणाम झाला होता. ज्याने आपल्या आईला मारहाण केली त्याचा वचपा काढण्याचा प्लॅन त्याच्या डोक्यात शिरला होता त्यामुळे त्या मुलाने त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे हात दुपट्याने बांधून विहिरीत ढकलून त्याच्या हत्या केली. ही धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यात उघडकीस आली असून कारला शिवार परिसरात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सागर पेंदाम ( वय 21 राहणार बोरगाव ) जय वसंत गवई ( वय 19 राहणार नालवाडी ) व शैलेश गजानन कोवे ( वय २६ राहणार इंदिरानगर ) यांना अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मयत राजू परचाके ( राहणार बोरगाव ) हा गवंडी काम करत असे. तीन दिवसापूर्वी राजूचा शेजारी राहणाऱ्या शोभा पेंदाम यांच्याशी बचत गटाच्या पैशातून वाद झाला होता. त्यानंतर राजू याने शोभा पेंदाम यांना मारहाण केली होती. याबाबतची तक्रार शोभाने पोलिसात दिली होती आणि त्यावरून राजूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. In Wardha district, a man killed a man who had beaten his mother for a minor reason

आईला केलेल्या या मारहाणीचा शोभा यांचा मुलगा असलेल्या सागर यास इतका राग आला होता की त्याने या अपमानाचा बदला घेण्यासाठी तो राजू परचाके याचा शोध घेत होता. दोन दिवसांनंतर अखेर अठरा तारखेला राजू परचाके हा आलोडी परिसरात रात्रीच्या सुमारास सागरला भेटला. सागर पेंदाम व त्याच्या दोन मित्रांनी राजुला जबरदस्त मारहाण केली त्यानंतर त्याचे हात त्याच्याच दुपट्याने बांधून त्याला परिसरातील शेतातील विहिरीत फेकून दिले.

दुसऱ्या दिवशी सकाळी शेतमालक कृषी पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत राजू याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यानंतर त्यांनी सदर प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला आणि संशयित आरोपींचा शोध सुरू केला त्यानुसार पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

शोभा पेंदाम यांना मारहाण केल्यानंतर आरोपी सागर हा त्याच्या मागे असल्याची माहिती मयत राजू त्याला मिळाली होती त्यामुळे राजू हा घाबरून घरातून बेपत्ता झाला होता त्यानंतर कारला शिवारातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटली नसल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह सामान्य रुग्णालयात पाठवला असतानाच दरम्यान राजूची पत्नी मिसिंगची तक्रार दाखल करण्यासाठी शहर ठाण्यात गेली त्यानंतर तो मृतदेह राजुचाचा असल्याची खात्री पटली आणि संशयित म्हणून आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांनी या खुनाची कबुली दिली असून सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.


शेअर करा