काय पण करून फेसबुक वापरायचंच होत मात्र ‘ असं काय ‘ केले की पडल्या हातात बेड्या

शेअर करा

गुजरातमधील सुरत इथून सुमारे सात किलो सोन्याची चोरी करून तो पुन्हा महाराष्ट्रात आला होता. जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असून स्थानिक गुन्हे शाखा देखील त्याच्या शोधात होती मात्र तो पोलिसांना वारंवार चकवा देत होता. त्यानंतर सोशल मीडियाच्या नादापायी त्याने चोपडा येथील एका महिलेचा मोबाइल चोरला. त्या महिलेचा मोबाईल चोरल्यानंतर तिच्या फोटोचा गैरवापर केला आणि फेसबुकवर बनावट खाते तयार करून त्या महिलेच्या ओळखीच्या लोकांशी चॅटिंग सुरू केले. The accused was arrested for stealing a mobile phone to use Facebook

प्रशांत जगन वारडे ( 26 राहणार गोरगावले तालुका चोपडा ) असे आरोपीचे नाव असून सायबर पोलिसांनी त्याला बुधवारी गोरगावले येथून अटक केली आहे. चोपडा येथील रूपाली भिकन पाटील यांचा मोबाईल राहत्या घरातून 14 जुलै रोजी चोरी झाला होता या मोबाईलमध्ये त्यांचे कित्येक फोटो होते. या फोटोच्या आधारे आरोपीने त्यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार केले आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणे आणि चॅटिंग करणे सुरू केले.

आपले फेसबुक खाते नसताना आपल्या नावावर कोणीतरी हा प्रकार करत असल्याचे लक्षात आल्यावर पाटील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सायबर पोलिसांनी याबद्दल तक्रार नोंदवली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशीत प्रशांत वारडे याचे नाव आले. कॉन्स्टेबल सचिन सोनवणे व अरविंद वानखेडे यांनी चोपड्यात त्याचा शोध घेतला आणि त्यानंतर त्याला गोरगावले येथून घरातूनच ताब्यात घेण्यात आले.

वारडे याने गुजरात इथे सुरतमध्ये सात किलो सोने चोरले आहे त्याशिवाय चोपडा येथे देखील तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असून स्थानिक गुन्हे शाखा त्याच्या मागावर होती मात्र तो सातत्याने त्यांना चकवा देत होता. आता सायबर पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर सोनेचोरी चौकशीसाठी त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात येणार आहे.


शेअर करा