संपत बारस्कर यांच्या घरावर दगडफेक , तोफखान्यात गुन्हा दाखल

शेअर करा

नगर शहरात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून सावेडी इथे तरुणांच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून संपत बारस्कर यांच्या घरावर दगडफेक करून घराच्या काचा फोडण्यात आल्या आणि घरात घुसत संपत बारस्कर आणि त्यांची पत्नी यांना धक्काबुक्की तसेच शिवीगाळ करण्यात आलेली आहे . तोफखाना पोलिसात तब्बल आठ जणांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , आशा संपत बारस्कर ( वय 43 वर्ष राहणार भिस्तबाग ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिलेली असून त्यांचे पती संपत बारस्कर हे शेती करत असून त्यांचा मुलगा वैभव संपत बारस्कर आणि मयूर सोमवंशी ( राहणार पाईपलाईन रोड ) यांच्यात सुमारे एक वर्षांपूर्वी भांडण झालेले होते. मयुर याने मुलाच्या विरोधात तोफखाना पोलिसात फिर्याद दिली होती त्यानंतर मयूर आणि त्याचे मित्र घरासमोर मोटरसायकलचा आवाज करत त्रास द्यायचे मात्र त्याकडे फिर्यादी यांनी दुर्लक्ष केलेले होते. 

दोन तारखेला रात्री साडेनऊच्या सुमारास बारस्कर कुटुंब घरात जेवण करत असताना घरामागच्या खिडकीवर दगड मारल्याचा आवाज आला म्हणून कुटुंबीयांनी तिकडे काय झाले पाहण्यासाठी धाव घेतली तेव्हा तिथे मयूर सोमवंशी , त्याचा भाऊ गौरव सोमवंशी आणि त्यांचे मित्र राज पवळे , रोहित साळुंखे , सोमनाथ गुंजाळ , चंदन ढवण , विकास धवन व इतर ( सर्वजण राहणार पद्मा नगर ) हे हातात काठ्या आणि दगड घेत लोखंडी रोड घेऊन उभे होते खिडकीच्या काचावर ते दगड मारत होते

 फिर्यादी यांनी त्यांना विचारणा केली त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी वैभव तसेच त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करण्यास सुरू केले आरोपी मयूर सोमवंशी आणि चंदन ढवण हे पत्र्याच्या कंपाउंड मधून हाताने आणि त्यांनी संपत बारस्कर यांना धक्काबुक्की करत तुमचा मुलगा कुठे आहे त्याला पाहून घेतो त्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली मयुरी यांनी संपत बारस्कर यांना पकडून शिवीगाळ केली तसेच तुझ्या मुलाला नीट समजून सांग नीट राहिला सांग असे सांगत धमकावत देते तुम्ही गुण गेले फिर्यादी यांनी त्यानंतर कुटुंबीयांसोबत तोफखाना पोलिसात धाव घेऊन आरोपींच्या विरोधात तक्रार दिलेली आहे


शेअर करा