केंद्राने तात्काळ कांदा निर्यात बंदी उठवावी , केंद्रीय पथकाला निवेदन

शेअर करा

राज्यातील कांद्याची पाहणी करण्यासाठी केंद्रिय अधिकारी यांचे पथक 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र दौरावर आहे .सदर पथक मंगळवारी 6 तारखेला बीड जिल्ह्यातील कांदा पाहणी करुन नगर मुक्कामी आले होते  ही महिती शेतकरी नेते श्री प्रसाद खामकर यांना कृषी मंत्रालय , दिल्ली  येथुन प्राप्त झाली , 

श्री खामकर यांनी पारनेर तसेच श्रीगोंदा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी यांच्या समवेत केंद्रिय पथकाची सरकारी गेस्ट हाऊस नगर येथे भेट घेतली आणि पारनेर आणि श्रीगोंदा कांदा उत्पादक शेतकरी  यांच्या वतीने कांदा निर्यात बंदी उठवण्याबद्दल निवेदन दिले . 

निवेदनात म्हटले आहे की , केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने मागील काही दिवसापासून राज्यातील कांद्याचे बाजारभाव घसरले आहे. सर्वात जास्त कांदा उत्पादक महाराष्ट्रात असून येथे चांगल्या पध्दतीने कांदा उत्पादन होते. अतिवृष्टमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादकांना निर्यात बंदीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कष्टकरी शेतकऱ्यांच्या कांद्याला परदेशी वारीसाठी मुक्त केले पाहिजे. केंद्र सरकारने याबाबत लक्ष घालून तात्काळ निर्यात खुली करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे . या पथकामध्ये ग्राहक कल्याण मंत्रालय संचालक आयएएस श्री सुभाषचंद्र मीना , कृषी मंत्रालयाचे उपसंचालक  आयएएस श्री पंकज कुमार आणि अवर सचिव श्री मनोज के. यांचा समावेश होता.


शेअर करा