पोटात दुखतंय म्हणून घरच्यांनी दवाखान्यात नेताच ‘ धक्कादायक ‘ सत्य आले समोर : कुठे घडली घटना ?

शेअर करा

एका अल्पवयीन मुलीला मोबाईलवरून संपर्क करत तिच्याशी जवळीक साधित अनेकदा तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे एका युवकावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेन्सी फ्रान्सिस फर्नांडिस (वय 33 राहणार फोंडा घाट ) असे त्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदानुसार विविध कलमाद्वारे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. The victim became pregnant after being lured into marriage

उपलब्ध माहितीनुसार,संशयित आरोपी सध्या फरार असून हा सर्व प्रकार सप्टेंबर 2019 ते आक्टोंबर 2020 या कालावधीत घडलेला आहे. या प्रकाराने कणकवली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला संशयित आरोपीने सप्टेंबर 2019 मध्ये प्रथम मोबाईलवर संपर्क केला त्यानंतर त्यांची ओळख वाढल्याने जवळपास एक महिनाभर त्यांचे फोनवरून बोलणे होत होते.

ऑक्टोबर महिन्यात या दोघांची कणकवली येथे भेट झाली , त्यानंतर आरोपीने या अल्पवयीन मुलीला एका रिक्षामधून नांदगाव येथे लॉजवर नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी त्याने पुन्हा फोन केला आणि झालेला ‘ हा ‘ प्रकार एका व्हिडिओमध्ये मी शूटिंग करून ठेवलेला आहे तू माझ्यासोबत पुन्हा आली नाहीस तर तो व्हिडिओ मी तुझ्या घरच्यांना दाखवीन, अशी धमकी त्यांनी दिली त्यानंतर जवळपास पाच ते सात वेळा त्याने धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले. ऑगस्ट महिन्यानंतर ही मुलगी मुंबईला निघून गेली.

काही दिवसांपूर्वीच ही मुलगी पुन्हा आपल्या गावी आली मात्र 17 ऑक्टोबर रोजी त्या अल्पवयीन मुलीची तब्येत खालावली, त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांना संशय आला आणि त्यांनी तिला दवाखान्यात दाखल केले त्यावेळी ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी या घटनेबाबत कणकवली येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून अद्याप त्याला पकडण्यात आलेले नाही सदर प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.


शेअर करा