नगर शहरात फ्लेक्स साठी हजारो रुपये उधळणाऱ्या बाकी लोकप्रतिनिधींना हे दिसत नाही का ? 

शेअर करा

नगर शहरात चौकाचौकात फ्लेक्स बाजी करत शहर विद्रूप करण्यासाठी हजारो रुपये खर्च करणाऱ्या लोकप्रतिनिधींना नगर शहरातील पुणे बस स्टॅन्ड वर येणाऱ्या नागरिकांचे हाल मात्र दिसून येत नसल्याचे दुर्दैव आहे .पुणे बस स्टैंड वर नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल नगर चौफेर ने काही दिवसांपूर्वी वृत्त प्रकाशित केल्यानंतर माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रयत्नातून सहा बाकडी बसवण्यात आलेली होती ती अद्याप देखील सुस्थितीत दिसून येत आहेत. शहरातील इतर कुठल्याही लोकप्रतिनिधींना मात्र या गैरसोयीबद्दल काही घेणेदेणे राहिलेले नसल्याचे दिसून येत आहे. वाढत्या गर्दीमुळे अनेक जण फलाटावर येऊन उभे राहतात त्यामुळे नागरिकांच्या जीविताला देखील धोका निर्माण झालेला आहे.

नगर शहरात काही ठिकाणी चौकाचौकात नगरसेवकांकडून बाकडी बसवण्यात आलेली आहे मात्र या बाकड्यांवर ज्येष्ठ आणि वृद्ध नागरिक यांच्यापेक्षा रात्री अकरानंतर तळीरामांचीच जास्त बैठक बसते त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होत आहे. नगर शहरातील पुणे बस स्टॅन्ड इथे कमीत कमी काही बाकडी बसवण्यात यावी अशी मागणी उपस्थित प्रवाशांनी नगर चौफेर प्रतिनिधीशी बोलताना केलेली होती.

नगर शहरातील माजी नगरसेवक निखिल बाबासाहेब वारे यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांच्यातर्फे पुणे बसस्टॅन्ड इथे सुमारे सहा बाकडी काही महिन्यांपूर्वी बसवण्यात आली आहेत. माजी नगरसेवक निखिल वारे हे वास्तविक सावेडी प्रभागातील माजी नगरसेवक असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी पुणे बसस्टॅन्ड इथे देखील प्रवाशांना बसण्यासाठी बाक उपलब्ध करून दिल्याने अनेक जणांनी माजी नगरसेवक निखिल वारे यांचे आभार मानलेले आहेत . शहरातील इतर नगरसेवकांनी देखील यापासून बोध घेण्याची गरज असल्याची अपेक्षा अनेक प्रवाशांनी व्यक्त केलेली आहे.


शेअर करा