अहमदनगर महापालिकेचे ‘ अहंकारी विमान ‘ जमिनीवर ,  ‘ त्या ‘ भगिनींचे उपोषण मागे

शेअर करा

नगरमधील प्रतिष्ठित लोकप्रतिनिधींवर खळबळजनक आरोप करत अहमदनगर महापालिका कार्यालयासमोर दोन बहिणींनी सुरू केलेल्या उपोषणानंतर महापालिका प्रशासनाचे अहंकारी विमान जमिनीवर आलेले असून या भगिनींच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर त्यांनी आमरण उपोषण मागे घेतलेले आहे अशी माहिती त्यांनी नगर चौफेर प्रतिनिधीला फोनवरून दिलेली आहे. 

नगर शहरातील दौंड रोडवरील हनुमान नगर येथील अतिक्रमण संदर्भात अनेकदा तक्रारी करून देखील या भगिनींची कुठेही दखल घेतली जात नव्हती .  कोर्टात निर्णय होऊन देखील कारवाई होत नसल्याने हतबल झालेल्या दोन्ही बहिणींनी महापालिका कार्यालयासमोर पाच तारखेपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती . नगर शहरातील आमदार , खासदार तसेच माजी नगरसेविका लता बलभीम शेळके आणि त्यांचा मुलगा सुरज बलभीम शेळके यांच्यावर देखील त्यांनी धक्कादायक असे आरोप केलेले होते. 

माजी सैनिकाच्या घरासमोर मोठा खड्डा खणून जाण्या येण्यास अडथळा निर्माण केला आणि त्यासंदर्भात अनेकदा पालिकेत तक्रारी देऊन देखील कुठलीही कारवाई झाली नाही. महापालिका आयुक्त पंकज जावळे यांनी देखील या दोन्ही बहिणींना अनेकदा अपमानित केले असे त्यांचे म्हणणे होते . न्यायालयाचा निर्णय होऊन देखील कुठलीही कारवाई महापालिकेकडून होत नसल्याने नगरचे आमदार संग्राम जगताप यांचे आणि शेळके कुटुंबीय यांचे राजकीय संबंध असल्याकारणाने कारवाई होत नसल्याचा आरोप दोन्ही बहिणी केलेला होता. 

काल उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी महापालिकेने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या असून 312 /20 न्यायालयाच्या निकालानुसार कारवाई करण्यात येणार आहे असे त्यांना सांगितले आहे सोबतच जेसीबीने सुरज शेळके यांनी घेतलेला खड्डा पंचनामा करून त्यांना रॅम्प बांधून देण्यात येणार आहे आणि तो पंचनामा कोर्टात देखील सादर केला जाणार आहे . उपोषण करणाऱ्या दोन्ही बहिणींनी अवघ्या तीन दिवसात महापालिका अधिकाऱ्यांचे तसेच लोकप्रतिनिधींचे अहंकारी विमान जमिनीवर आणलेले आहे . 


शेअर करा