मोदींना नेहरू सोडून काहीच दिसेना , शरद पवारांनी ठणकावलं

शेअर करा

पंतप्रधान मोदी अद्यापही आपण दहा वर्षात काय केले यापेक्षा काँग्रेसवरच टीका करण्यात पदाचा मौल्यवान वेळ वाया घालवत आहेत . भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यावर पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा अत्यंत खालच्या पातळी टीका केलेली असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना या संदर्भात खडे बोल सुनावले आहेत. 

दिल्ली येथे बोलताना शरद पवार म्हणाले की , ‘ राजकारणात विविध विचारसरणी असतात हे मान्य आहे पण एखाद्या महान नेत्याचे यामुळे योगदान नाकारता येत नाही . पंडित नेहरू यांनी भारत देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले . त्यांच्यापासूनच भारतातील लोकशाहीला सुरुवात झाली . विज्ञान-तंत्रज्ञानाला पंडित नेहरूंनी चालना दिली त्यांचे हे योगदान आजचे सत्ताधारी कसे नाकारू शकतात . दिवंगत नेत्यावर अशा स्वरूपाची टीका योग्य नाही. धार्मिक विधाने करीत सध्या देशाची दिशाभूल चालू आहे. 

शरद पवार पुढे म्हणाले की , ‘ इथून मागच्या काँग्रेस सरकारना लक्ष करताना आपले सरकार किती वेगवान काम करते हे मोदींनी जनतेच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकसभा निवडणुकीआधी अखेरच्या अधिवेशनातून मोदींनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवून खरंतर लोकसभेचा प्रकार कसा असेल याची झलक दाखवली . 

देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या नेत्यांनी आपल्या आयुष्यातील मोठा काळ तुरुंगात घालवला त्यात पण पंडित नेहरू अग्रक्रमाने येतात .  देशासाठी ज्यांनी काम केलं त्यांचे काम आपण नजरेआड कसे करू शकतो मग ते पंडित नेहरू असोत व इंदिरा गांधी असोत. प्रत्येक पंतप्रधानाचे आपल्या परीने देशासाठी योगदान असतं . पंतप्रधान हा पक्षाचा नसतो तर देशाचा असतो , ‘ असे देखील शरद पवारांनी मोदी यांना ठणकावले आहे.


शेअर करा