जिल्ह्यात पुन्हा प्रतिबंधात्मक आदेश लागू ,  अंमलबजावणीचा मात्र बट्ट्याबोळ

शेअर करा

कुठल्याही पद्धतीने कुणीही पालन करत नसताना आणि आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असताना जिल्ह्यात पुन्हा एकदा 3 फेब्रुवारी पासून 16 फेब्रुवारी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत. सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हा महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 एक व 37 3 अन्वये हे आदेश जारी केलेले आहेत . 

दरम्यानच्या कालावधीत शस्त्र , तलवारी, भाले, दंडुके ,बंदूक, सुरे , लाठ्या-काठ्या आणि शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कुठलीही गोष्ट सोबत नेणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची उपकरणे किंवा साधने जमा करणे , स्वतःजवळ बाळगणे तयार करणे , जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे ,वाद्य वाजवणे , ध्वनी वर्धक आणि मानवी आवाजाचे वर्धन करणारा संच वापरणे किंवा वाजवणे. 

सभ्यता आणि नीतिमत्ता यास धक्का पोहोचेल आणि शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे . आवेशपूर्ण भाषणे करणे , हावभाव करणे , आक्षेपार्ह चित्रे , चिन्हे आणि वस्तू तयार करणे त्यांचा प्रचार करणे प्रदर्शन करणे , सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास आणि मिरवणुका काढण्यास तसेच पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी करण्यात आलेली आहे. 

शासकीय सेवेतील व्यक्तींना आपल्या कर्तव्याच्या पूर्तीसाठी वरिष्ठांच्या आदेशानंतर हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे तसेच प्रेतयात्रा , धार्मिक कार्यक्रम , धार्मिक मिरवणूक , लग्न समारंभ , लग्नाच्या मिरवणुका हे कार्यक्रम तसेच सभा घेण्यास आणि मिरवणुका काढण्यास प्रभारी पोलीस निरीक्षक ,सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रीतसर परवानगी घेतलेली आहे अशा व्यक्तींना मात्र हा आदेश लागू राहणार नाही. 


शेअर करा