मुंबईहून पाथर्डीत आलेला व्यापारी ‘ रहस्यमय ‘ रित्या गायब , पोलिसात तक्रार दाखल

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना पाथर्डी इथे समोर आलेली असून मुंबई येथून पाथर्डी इथे आलेला एक सोन्याचा व्यापारी बुधवारी रात्री साडेसातपासून बेपत्ता झालेला आहे. एका खाजगी लॉजवर मंगळवारी ते मुक्कामाला आलेले होते त्यानंतर बुधवारी दिवसभर पाथर्डीतील सोन्याच्या दुकानदारांच्या भेटी त्यांनी घेतल्या होत्या. बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता घरच्यांसोबत त्यांचे बोलणे देखील झाले मात्र रात्री नऊनंतर ते गायब झालेले आहेत. 

उपलब्ध माहितीनुसार , दिपेश जैन असे या व्यापाऱ्याचे नाव असून मुंबई येथून ते व्यवसायाच्या निमित्ताने पाथर्डीत आलेले होते मंगळवारी दिवसभर पाथर्डीत मंगळवारी रात्री ते एका खाजगी लॉजवर थांबले त्यानंतर बुधवारी दिवसभर सोन्याच्या दुकानदारांच्या भेटी घेतल्या संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचे घरच्यांसोबत देखील बोलणे झाले मात्र त्यानंतर नातेवाईकांसोबत त्यांचा संपर्क झाला नाही. 

दीपेश फोन उचलत नसल्याकारणाने त्यांच्या नातेवाईकांनी पाथर्डीत येऊन पोलिसात दीपेश जैन गायब झाल्याची तक्रार दिलेली आहे . सोन्याच्या दुकानदारांना सोने देऊन ते त्यांच्याकडून पैसे घेऊन मुंबईला जात असत मात्र अचानकपणे ते गायब झाल्यानंतर नातेवाईकांना त्यांची चिंता वाटू लागली . त्यांचा मोबाईल देखील रूमवर राहिलेला असून त्यांच्याकडे पैसे किती होते गायब कशामुळे झाले ? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले असून पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केलेली आहे. 


शेअर करा