भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही ,  निखिल वागळे यांची फेसबुक पोस्ट

शेअर करा

चाळीस वर्षापासून पत्रकारिता करणारे निखिल वागळे यांच्या गाडीवर पुण्यात भाजपच्या काही गुंडांनी हल्ला केला. आत्तापर्यंत या प्रकरणात दहा जणांवर गुन्हे दाखल झालेले असून समोरील व्यक्तीला बोलण्याचे काही स्वातंत्र्यच द्यायचे नाही असा प्रकार भाजपच्या कार्यकाळात जास्त प्रमाणात सुरू झालेला आहे. निखिल वागळे यांनी हल्ला झाल्यानंतर एक पोस्ट त्यांच्या फेसबुक अकाउंट ला शेअर केलेली असून त्यामध्ये त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार मानलेले आहेत सोबतच भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही असे देखील त्यांनी प्रत्युत्तर दिलेले आहे. 

काय आहे निखिल वागळे यांची फेसबुक पोस्ट ? 

प्रिय मित्र- मैत्रिणीनो, भावांनो-बहिणींनो, काल मृत्यू दारात दारात उभा राहिला होता. केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो. मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले तरी मागे न हटणारा असीम सरोदे.,जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव, पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲड श्रीया, शेवटपर्यंत साथ देणारे विश्वंभर, रस्त्यावर उतरुन हल्लेखोरांशी दोन हात करणारा बंटी, भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांचं ऋण मी कसं फेडू? भाजपच्या गुंडाशी दोन हात करणारे राहुल डंबाले, प्रशांतदादा जगताप यांची कुमक..कॅांग्रेसचे अरविंद शिंदे, वंचित आणि आपचे कार्यकर्ते, धोका पत्करुन मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य..राहुल तर मला सोडायला सहकुटुंब मुंबईपर्यंत आले. कुणाकुणाची नावं घेऊ? सगळ्यांचा मी ऋणी आहे.

आजवर सहा हल्ले पचविले. कालचा हल्ला सगळ्यात भयानक होता. दगड, लाठ्याकाठ्या, हॅाकी स्टिक्स, रॅाड्स, अंडी, शाई सगळ्याचा वापर झाला. अवघ्या अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करुन आम्हाला घेरण्यात आलं. पोलीसांच्या संगनमताने हा हल्ला झाला. काल आम्ही सगळे वाचलो केवळ फुले-आंबेडकर यांच्या आशिर्वादाने ही माझी श्रद्धा आहे.

आता यापुढचं आयुष्य तुमच्यासाठी. फॅसिजमचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू. अशा भ्याड हल्लांची भीती बाळगण्याचे आमचे संस्कार नाहीत. या देशाचा हिंदू पाकिस्तान होऊ नये म्हणून पुन्हा जीवाची बाजी लावेन एवढंच इथे सांगतो. तुमचं सगळ्यांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. कालची सभा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळे झटलात..आभार कसे मानू ?जास्त बोलवत नाही. कालच्या धक्क्यातून अजून बाहेर आलेलो नाही. संध्याकाळी तुमच्याशी सविस्तर बोलीनच. तुमचा निखिल


शेअर करा