जातीचा विषय निघाला की ‘ गरीब श्रीमंत ‘ वर विषय न्यायचा अन पुन्हा ओबीसी सांगायचं

शेअर करा

‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी सांगतात मात्र ते ओबीसी नाहीत . स्वतःला ओबीसी म्हणत ते लोकांची फसवणूक करत आहेत ‘ असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला असून त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांचा नेहमीप्रमाणे चांगलाच थयथयाट सुरू झालेला आहे. 

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत बोलताना मोदी स्वतः ओबीसी कसे झाले याविषयी वक्तव्य केले. ते म्हणाले की , ‘ मोदी ज्या जातीत जन्माला आले ती सामान्य प्रवर्गात येते आपण ओबीसी असल्याचे खोटे सांगत मोदींनी दिशाभूल केली . त्यांचा जन्म घांची या जातीत झालेला आहे. 2000 साली गुजरात मधील भाजप सरकारच्या कार्यकाळात या जातीचा ओबीसीत समावेश करण्यात आला आणि त्यानंतर मोदी यांनी आपली जात बदलत ओबीसी केली त्यामुळे मोदी जन्मजात ओबीसी नाहीत . ‘ 

राहुल गांधी पुढे म्हणाले की , ‘ आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी करतो तेव्हा मोदी देशात केवळ श्रीमंत आणि गरीब या दोनच जाती असल्याचे म्हणतात असे असेल तर मोदी गरीब नाहीत मग ते आपण ओबीसी असल्याचे का सांगतात ? असा देखील प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला आहे.


शेअर करा