
महसूल मंत्री तसेच पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी नगर जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केलेली होती त्यानंतर अखेर शिर्डीजवळील सावळी विहीर खुर्द इथे हे महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय एक डिसेंबर 2023 रोजी सरकारने घेतलेला होता. त्या अनुषंगाने नवीन पशु वैद्यकीय महाविद्यालयात नियमित स्वरूपात नोकरी संदर्भात जीआर शासकीय वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
९ फेब्रुवारी २०२४ रोजी हा जीआर काढण्यात आलेला असून त्यामध्ये नियमित स्वरूपात शिक्षक संवर्गातील 96 , शिक्षकेतर संवर्गातील 138 आणि बाह्य श्रोताद्वारे शिक्षकेतर संवर्गातील भरावयाची 42 पदे अशा एकूण 276 पदांना उच्च अधिकार समितीच्या मान्यतेच्या अधीन राहून मंजुरी देण्यात आलेली आहे . विविध स्वरूपांच्या पदासाठी हा जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला असून अवघ्या काही महिन्याच्या आत आता शिर्डीजवळील सावळी विहीर इथे पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.