तिच्या सोसायटीतल्या घरांसमोर ‘ मेमरी कार्ड अन चॅट प्रिंट ‘ ठेवून गेला

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून एका बावीस वर्षीय तरुणीचे नको ते व्हिडिओ बनवत तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. मुंबईत साकीनाका पोलिसात या प्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला असून आरोपीने तिने लैंगिक सुखाला नकार दिल्यानंतर तिचे अश्लील चित्रीकरण असलेले मेमरी कार्ड आणि व्हाट्सअप संभाषणाची प्रिंट काढून ती राहत असलेल्या सोसायटीतील प्रत्येक घरासमोर नेऊन ठेवले होते. 

उपलब्ध माहितीनुसार , गुरवैया बुसीरासी ( वय 41 ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून फिर्यादी तरुणी आणि तो यांच्यात 2019 पासून प्रेम संबंध होते . फेब्रुवारी 2019 ला त्याने तिला एका लॉजवर नेले आणि तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि ते शूटिंग व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर तो वेळोवेळी हे शूटिंग आणि फोटो याच्या आधारे तिला ब्लॅकमेल करू लागला. 

पीडित तरुणी त्याच्या या त्रासाला कंटाळून गेली आणि त्यानंतर तिने त्याला स्पष्ट स्वरूपात अशा प्रकाराला नकार दिला. त्याचा आरोपीला राग आला आरोपीने त्यानंतर मोबाईलमध्ये केलेले शूटिंग आणि व्हाट्सअप मध्ये झालेली चॅटिंग याचे प्रिंट आउट काढत ती जिथे राहते तिथे शूटिंगचे मेमरी कार्ड आणि व्हाट्सअप च्या प्रिंट सोसायटीतील प्रत्येक घरांच्या समोर एका लिफाफ्यात घालून ठेवून दिल्या  तिच्याबद्दल अनेक अश्लील गोष्टी लिहून तिची त्याने बदनामी देखील केली. 

सोसायटीत या प्रकाराची चर्चा झाली आणि त्यानंतर ही तरुणी प्रचंड दडपणाखाली आली . बदनामीमुळे ती घाबरून गेली म्हणून ती पोलिसात गेली नाही मात्र आरोपी तरी देखील तिला त्रास देत होता अखेर या त्रासाला कंटाळून तिने पोलिसात धाव घेतलेली असून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


शेअर करा