नवरा सोडेल पण ‘ मशेरी ‘ सोडणार नाही , बायकोच्या हट्टापुढे नवरा हतबल

शेअर करा

अनेक बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मशेरी असतो . तंबाखू असलेली मशेरी तंबाखू इतकी कडक  नसली तरी त्यापासून देखील कॅन्सरची शक्यता आहे मात्र मशेरीमुळे एक प्रकरण चक्क घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचले आहे. 

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ही घटना असून पती-पत्नीतील हे भांडण सध्या चांगलेच चर्चेत आलेले आहे. एका व्यक्तीच्या पत्नीला मशेरीची सवय होती . दिवसातून तीन ते चार वेळा ती मशेरी लावायची त्यामुळे पती नाराज झाला आणि त्याने तिला अनेकदा समजावून सांगितले मात्र तिच्या सवयीत काही बदल झाला नाही . कुटुंब समुपदेशन केंद्रापर्यंत हे प्रकरण पोहोचलेले असून धक्कादायक म्हणजे पत्नीने नवरा सोडेल पण मशेरी सोडणार नाही असे पतीला ठणकावले आहे. 

पतीने म्हटले आहे की , आपली पत्नी दिवसातून तीन ते चार वेळा मशेरी लावते आणि त्यानंतर इकडे तिकडे फिरत राहते . अनेकदा तिला विरोध केला मात्र तिने आपली ऐकले नाही त्यानंतर भांडण झाल्यावर आपण तिला घराबाहेर काढले त्यानंतर ती माहेरीच राहत होती. नात्यात दुरावा आल्यानंतर अखेर आम्हाला कौटुंबिक समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचावे लागले. 

आग्रा येथील मंतोला पोलीस स्टेशन परिसरातील कुटुंब समुपदेशन केंद्रात या महिलेला आणि तिच्या पतीला बोलावण्यात आलेले होते त्यावेळी पतीने लग्नाआधी आपल्याला तिच्या या सवयी बद्दल माहिती नव्हती . लग्नानंतर आठ महिन्यांनी हा प्रकार समजला त्यावरून वाद झाले . तिला मशेरी लावण्यासाठी रोखले मात्र तिने सवयीत बदल केला नाही म्हणून वादाला सुरुवात झाली. पोलिसांनी देखील महिलेला मशेरी आरोग्यास हानिकारक आहे याची माहिती महिलेला दिली मात्र तिने नवरा सोडेल पण मशेरी सोडणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे समुपदेशन केंद्रात पुन्हा एकदा पुढील तारीख त्यांना देण्यात आलेली आहे. 


शेअर करा