‘ ओव्हर कॉन्फिडन्स ‘ नडला ,  होम ग्राउंडवरच विखे पाटील यांच्या समर्थकांच्या हातात भोपळा

शेअर करा

महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा शिर्डीत साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत अक्षरश: दारुण पराभव झाला आहे. कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलचा या निवडणुकीत दणदणीत विजय झाला असून परिवर्तन पॅनलने या निवडणुकीत 17 पैकी 17 जागांवर विजय मिळवला आहे. 20 वर्षांपासून विखे पाटील यांच्या समर्थकांची इथे सत्ता होती मात्र यावेळी झालेल्या निवडणुकीत विखे पाटील गटाच्या हातून सत्ता निसटली असून सत्तांतर अखेर झालेले आहे . 

साईबाबा कर्मचारी सोसायटीची वार्षिक उलाढाल ही 150 कोटींची असून त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची होती. गेल्या 20 वर्षांपासून ही संस्था विखे समर्थकांच्या ताब्यात होती मात्र या निवडणुकीत विखे समर्थकांच्या पॅनलच्या हाती भोपळा आलेला आहे. विखेंच्या समर्थक पॅनलला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही त्यामुळे विखे पाटील गटासाठी हा मोठा झटका मानला जात आहे . 

संस्थेच्या 17 जागांसाठी 53 उमेदवारांनी आपलं नशिब आजमावलं आणि 1650 सभासदांनी या निवडणुकीसाठी मतदान केलं. विखे पाटील यांच्या गटाला धक्का लागण्यामागे कारण म्हणजे त्यांच्या समर्थक कर्मचाऱ्यांच्या दोन वेगवेगळ्या पॅनलचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिले होते तर दुसरीकडे विठ्ठल पवार यांच्या विकास पॅनलने या दोन्ही पॅनलला आव्हान देत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती त्यामुळे मत विभाजन झाले आणि प्रचंड  ओव्हर कॉन्फिडन्स असलेल्या विखे पाटील यांच्या समर्थकांच्या पॅनलला दारुण सामना करावा लागला. 


शेअर करा