मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली ,  मराठा क्रांती मोर्चाचा महाराष्ट्र बंदचा इशारा

शेअर करा

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केलेले असून त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.  त्यांची प्रकृती खालावली असून वैद्यकीय उपचार घेण्यास देखील त्यांनी नकार दिलेला आहे त्यामुळे समस्त मराठा बांधवांमध्ये त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता सुरू झालेली आहे . मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली असून राज्य सरकार मराठा बांधवांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा देखील आरोप समाजबांधवांकडून करण्यात येत आहे.  मराठा क्रांती मोर्चा कडून या संदर्भात एक प्रसिद्धी पत्रक देण्यात आलेले आहे

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की , ‘ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १० फेब्रुवारी, २०२४ रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. सर्व सामान्य मराठा समाज आज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे. सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळ काढूपणा करत आहे. उ‌द्या जर जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर, महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर्याने दाखल घ्यावी तरी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे त्याचाच भाग म्हणून अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद पुकारण्यात येत आहे ‘  सदर प्रसिद्धी पत्रकाच्या प्रती मा. जिल्हाधिकारी, मा. पोलीस निरीक्षक भिंगार, तोफखाना , कोतवाली,  एमआयडीसी , नगर तालुका  यांना देण्यात आलेल्या आहेत. 


शेअर करा