अहमदनगर मनपाच्या नगररचनाकारावर कारवाई कधी ? , मुंबईत केलं उपोषण

शेअर करा

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील जलजीवन पाणी पुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी, राहुरी कृषी विद्यापिठाचे कुलगुरु यांना पदमुक्त करावे व अहमदनगर महापालिकेतील नगर रचनाकार यांच्यावर गैरकारभाराबद्दल कारवाई करण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करण्यात आले. या उपोषणात जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, पारनेर तालुकाध्यक्ष पप्पू कासुटे, रमेश राठोड, रुपेष तायडे, राजेश आरकराव, उमेश धाटे, देवेंद्र तायडे आदी सहभागी झाले होते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील विद्यमान कुलगुरू यांची पदावर झालेली निवड नियमबाह्य आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. अहमदनगर महापालिकेतील नगर रचनाकार मूल्यनिर्धारण विभागातील गैर कारभाराबाबत एक वर्षापासून पाठपुरावा सुरु असून, त्यावर कारवाई केली जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील जलजीवन पाणी पुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी करुन ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे, राहुरी कृषी विद्यापिठाचे कुलगुरु यांना पदमुक्त करावे व नगर रचनाकार मूल्यनिर्धारण विभागातील गैर कारभाराबाबत कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.


शेअर करा