गुटखा प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी फौजदाराने केली ‘ ही ‘ विचित्र मागणी मग…?

शेअर करा

गुटखा वाहतूक प्रकरणात तक्रारदार व्यापाऱ्याला सहआरोपी न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेताना औरंगाबाद सिटी चौक पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री करण्यात आली. Faujdar Arrested for taking bribe in aurangabad city police station

संतोष रामदास पाटे असे या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. काही दिवसापूर्वी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने सुगंधी तंबाखू आणि प्रतिबंधित गुटका घेऊन जाणारे वाहन पकडले होते. तेव्हा त्या वाहनचालकाने त्याच्या वाहनातील माल तक्रारदाराकडून आणल्याचा जबाब दिला होता. त्याविषयी सिटी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटे करीत होता. याप्रकरणी तक्रारदार यांना सहआरोपी न करण्यासाठी आणि त्यांची पोलिस कोठडी न घेण्यासाठी संतोष रामदास पाटे याने त्यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार नोंदवली होती.

संतोष रामदास पाटे याला रंगेहाथ पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिटीचौक ठाण्याबाहेर सापळा रचला होता.ठरल्याप्रमाणे सिटीचौक ठाण्याच्या मागे आवारात तक्रारदार यांच्याकडून पन्नास हजार रुपये लाच घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी झडप घालून पाटे याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष रामदास पाटे याचे वडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून नुकतेच निवृत्त झाले आहेत. प्रामाणिक पोलीस कर्मचारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती. संतोष हा शहर पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबलपदी भरती झाला होता. दीड वर्षापूर्वी लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन तो फौजदार झाला होता. त्याची खुलताबाद तालुक्यात त्याच्या मूळ गावी शिक्षण संस्था असून तिथे त्याने इंग्लिश मिडीयम शाळा सुरु केली आहे.


शेअर करा