अवघ्या चार महिन्यापूर्वी ‘ प्रेमविवाह ‘ अन आता म्हणतो माझ्या मित्रांशी शारीरिक संबंध ठेव नाहीतर ?

शेअर करा

घरच्यांचा विरोध डावलून अवघ्या चार महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेला मद्यधुंद झालेल्या पतीने मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगितले. तिने यास नकार दिल्याने पती व त्याच्या मित्रांनी तिला लोखंडी पाईप आणि हाताने मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुणे परिसरात लोणी काळभोर येथे घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पतीसह त्याचे मित्र अशा चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. Husband forcing wife to have sex with friends in loni kalbhor

उपलब्ध माहितीनुसार, पीडितेचे वय हे एकोणीस वर्षे आहे. पीडित महिलेचा पती आणि त्याचे मित्र विशाल माने, तानाजी शिंदे, करण खडसे ( पूर्ण नाव आणि पत्ता माहीत नाही ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने घरच्यांच्या विरोधात जाऊन 22 जून रोजी देवाची आळंदी येथे प्रेमविवाह केला होता त्यानंतर ते लोणी काळभोर परिसरात राहत होते. पती ड्रायव्हर म्हणून काम करतो परंतु सध्या कोरोनामुळे त्याचा रोजगार गेलेला आहे. त्याला दारूचे व्यसन आहे . त्याचे मित्र सुरज कांबळे, तानाजी शिंदे, करण खडसे आणि विशाल माने हे दारू घेऊन यायचे आणि तिच्या पती बरोबर घरातच दारू प्यायचे .पत्नी या गोष्टीला विरोध करत असल्याने पती तिला मारहाण करायचा.

सोमवारी दिनांक 19 रोजी रात्री 8 च्या सुमारास ते दोघे घरी असताना माने व शिंदे माने दारूच्या बाटल्या आणि मटण घेऊन घरी आले. ती स्वयंपाक करायला लागली तोपर्यंत हॉलमध्ये सर्व जण दारू पीत होते. रात्री दहाच्या सुमारास सर्वांनी जेवण केले. अकराच्या सुमारास ती किचन मध्ये भांडी घासत असताना माने व शिंदे तिथे आले आणि त्यांनी तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तिने नकार दिल्याने पतीने लोखंडी पाईप हातात घेतला आणि पत्नीला मारहाण केली तर त्याच्या मित्रांनी देखील पीडित महिलेला मारहाण केली तिचा आरडाओरडा ऐकून शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्यांना घरातून हाकलून दिले.

पंधरा दिवसापूर्वी तिच्या पतीचा मित्र सुरज कांबळे व करण खडसे हे सकाळी अकराच्या सुमारास दारू घेऊन आले होते. जेवण झाल्यानंतर दोन्ही मित्रांनी वरीलप्रमाणे प्रकार केला होता. त्यावेळी देखील तिने नकार दिल्याने तिला सर्वांनी मारहाण केली होती. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एस पी पवार हे करत आहेत.


शेअर करा