धक्कादायक ..खड्ड्यात गाडी आदळताच बॅगमधील मृतदेह झाला जिवंत : महाराष्ट्रातील बातमी

शेअर करा

महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून आतापर्यंत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ७२ हजारांच्या देखील पुढे पोहचली आहे . एकीकडे केंद्राकडून मिळणारी अपुरी मदत आणि दुसरीकडे वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या यांनी राज्य सरकारच्या अडचणी दुर्दैवाने वाढत आहे . मात्र हे असतानाच रुग्णालयाचा गलथान कारभार देखील समोर येत असून रुग्णालयांमध्ये देखील गोंधळ असल्याचे चित्र आहेत . अशाच एका घटनेत मृत म्हणून दाखला दिलेला रुग्ण चक्क हालचाल करू लागल्याने नातेवाईकांत गोंधळ आणि भीतीचे वातावरण तयार झाले.

अलिबाग तालुक्यातील थळ येथील बबन म्हात्रे (लाटकर) यांचे मुंबईतील रुग्णालयात कॅन्सरवर उपचार सुरु होते. शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाल्याचे कळविण्यात आले होते. डॉक्टरांनीही त्यांचे डेथ सर्टिफेकेट तयार करुन मृतदेह घेऊन जाण्यास परवानगी दिली होती. वडखळ येथून येत असताना खड्ड्यात गाडी आदळली आणि मृतदेह ठेवलेल्या बॅगमध्ये हालचाल होत असल्याचे दिसून आले,बरोबर आलेल्या नातेवाईकांनी पाहिले असता श्वास सुरु झाला होता, हे पाहून नातेवाईकांना धक्काच बसला. आता पुन्हा मुंबईला जाणे शक्य नसल्याने त्यांनी जवळचे हॉस्पिटल गाठण्याचा निर्णय केला आणि अलिबागला पोहचले.

अलिबागच्या आरसीएफ कॉलनीतील हॉस्पीटलमध्ये तत्काळ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु झाल्यानंतर त्यांची काही काळापुरती प्रकृती सुधारु लागली मात्र शनिवारी सकाळी 11.00 वाजता पुन्हा प्रकृती खालावल्याने निधन झाले. बबन म्हात्रे (वय 65) यांच्यावर थळ येथील स्मशानभूमीमध्ये सायंकाळी उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

संबंधित बातम्या

भाडेकरू म्हणून आली अन मालकीण बनली पण तरीदेखील होता पैशांचा हव्यास : उचलले धक्कादायक पाऊल
https://nagarchaufer.com/?p=198

लॉकडाऊनमुळे भावी पतीचा विरह सहन होत नसल्याने नवरीने पायी गाठले भावी पतीचे घर : पुढे काय झाले ?
https://nagarchaufer.com/?p=80

एका मुलीची आई अविवाहित युवकाच्या प्रेमात, नवरा सोडून धरला प्रियकर मात्र ? : महाराष्ट्रातील बातमी
https://nagarchaufer.com/?p=239

लग्न झाल्यावर चारच दिवसात नववधू गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार उघड : महाराष्ट्रातील बातमी
https://nagarchaufer.com/?p=264

मोलकरणीशी अनैतिक संबंधाकरिता आईवडील बहीण आणि बायकोलाही संपवले : कुठे घडला प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=51


शेअर करा