त्याचे एकतर्फी प्रेम आणि तिचाही नकार यामुळे तरुण बिथरला आणि केले ‘ असे काही ‘ की ?

शेअर करा

घरासमोर असलेल्या मुलीवर एकतर्फी प्रेम आणि त्या प्रेमाला मुलीच्या वडिलांचा आणि मुलीचा देखील विरोध. त्यामुळे बिथरलेल्या युवकाने मुलीलाच संपवण्याचा प्लॅन केला आणि तो प्लॅन तडीस नेला. सकाळी मुलगी अंगणातील ज्या खाटेवर झोपली होती ती खाट रिकामी तर जवळच रक्ताचे थारोळे साचलेले त्यामुळे मुलीचा शोधाशोध सुरू झाला आणि अखेर घरापासून 200 मीटर अंतरावरील शेतात गोणपाटात मुलीचा गळा कापलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सारंगखेडा येथील भूतबंगला परिसरातील वस्तीत ही थरारक घटना २३ तारखेला पहाटे घडली. त्या परिसरात राहणारा किशोर शिवदास वडर ( वय 25 ) याचे त्याच्यात घरासमोरील दहावीत शिकणाऱ्या मुलीशी एकतर्फी प्रेमसंबंध होते आणि त्याला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता आणि मुलीच्या वडिलांनी त्याला कित्येकदा समजावून देखील सांगितले होते त्याचा त्याच्या मनात राग होता.

शुक्रवारी 23 तारखेला पहाटे एक ते सहाच्या दरम्यान मुलीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे मुलगी आपल्या घराच्या अंगणात खाटेवर झोपली होती. मध्यरात्रीनंतरच्या नीरव शांततेत त्याने मुलीचा धारदार शस्त्राने गळा कापून खून केला त्यानंतर तिचा मृतदेह एका गोणपाटात टाकून घरापासून 200 मीटर अंतरावर शरद बाबुलाल पाटील यांच्या शेतात फेकून दिला. बाहेर उघडयावर झोपण्याऐवजी जर रात्रीच्या वेळी घरात झोपण्याची खबरदारी घेतली असती तर मुलीचा जीव वाचला असता अशी हळहळ आता परिसरात व्यक्त होत आहे

सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अनुभवाच्या जोरावर तपासाला दिशा दिली आणि किशोर याचे नाव पुढे आले. सुरुवातीला त्याने या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. सायंकाळी उशिरा संतोष बिजलाल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून किशोर शिवदास वडर याच्याविरोधात सारंगखेडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.


शेअर करा