विवाहित महिलेच्या दुचाकीवर बसून म्हणाला ‘ मला तुझ्याशी लग्न करायचंय ‘

शेअर करा

विवाहित महिलेच्या दुचाकीवर बसवून तू मला खूप आवडतेस, चल आपण फिरायला जाऊ असे म्हणत तिच्या खांद्यावर हात ठेवत किराणा दुकानदाराने ब्युटीपार्लर चालवणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना धक्कादायक घटना सोलापूर शहरात गुरुवारी घडली आहे.आरोपीच्या विरोधात महिलेने फिर्याद दिली असून आरोपी हजरत अली शेख ( वय 21 राहणार नई जिंदगी ) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. A married woman was molested in Solapur city

उपलब्ध माहितीनुसार, फिर्यादी महिलाही ब्युटीपार्लर चालवत असून तिचे पती कामानिमित्त इतर शहरात असतात तर आरोपी हजरत अली याचे नई जिंदगी परिसरात किराणा दुकान आहे. या दुकानात माल घेण्यासाठी आल्यानंतर फिर्यादी महिलेची आणि आरोपींची ओळख झाली. ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून आरोपीने महिलेचा मोबाईल नंबर मिळवला त्यानंतर आरोपी हजरत अली हा त्या महिलेला दररोज संदेश पाठवत होता.

ऑगस्ट महिन्यात ही महिला ब्युटीपार्लर ऑर्डरसाठी बाहेर जात असताना आरोपी तिच्याजवळ आला आणि तिचा हात पकडत, माझे तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे म्हणू लागला. फिर्यादी महिलेला त्याचा राग आल्याने तो तिथून निघून गेला. त्यानंतर रात्री त्याने तिला व्हिडिओ कॉल करून तू माझ्याशी लग्न कर नाहीतर मी आत्महत्या करतो, असे म्हणत त्याने गोळ्या खाल्ल्या त्यामुळे त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला ही दुचाकीवरून घरी आल्यानंतर गाडीवरून उतरत असतानाच आरोपी हा महिलेच्या दुचाकीवर बसून, चल आपण बाहेर फिरायला जाऊ असे म्हणत तिच्या खांद्यावर हात ठेवला पण महिलेने ओरडल्यामुळे तो तिथून निघून गेला. त्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी महिलेशी अश्लील भाषा वापरत त्याने तिचा विनयभंग केला, अशा आशयाची फिर्याद महिलेने दिली आहे याबाबत आरोपी हजरत अली शेख याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे .


शेअर करा