मनोज जरांगे पाटील यांनी आज उपोषण मागे घेण्याची घोषणा केलेली असून साखळी उपोषण मात्र सुरू राहणार आहे . मनोज जरांगे पाटील यांनी उपचाराची तयारी दर्शवल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत काल मोठ्या प्रमाणात खालावली होती मात्र अशा परिस्थितीत देखील त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला मात्र सकाळपर्यंत हा निर्णय रद्द करत ‘ आहे त्या ‘ परिस्थितीत साखळी उपोषणाचा निर्णय आज घेण्यात आला .
मनोज जरांगे पाटील आज सकाळी बोलताना म्हणाले की , ‘ सगे सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे यासाठी आजही आमची स्पष्ट भूमिका असून देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर स्वागत आहे असे आव्हान दिलेले होते म्हणून काल जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता मात्र सरकारकडे संपूर्ण यंत्रणा असल्याकारणाने 17000 पोलिसांची फौज मराठा बांधवांसाठी उभी करण्यात आली होती तर अनेक पेट्रोलपंप इथे डिझेल न देऊन अडवण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला असता. मराठा बांधवांना सरकारच्या जाळ्यात ट्रॅपमध्ये मला अडकवायचे नव्हते आणि त्यांचे हाल होऊ द्यायचे नव्हते म्हणून मुंबईला जाण्याचा निर्णय स्थगित करण्यात आलेला आहे.
मनोज जरांगे पाटलांनी त्यानंतर , ‘ देवेंद्र फडणवीस यांनी आता तरी मराठा बांधवांची नाराजी पत्करू नये . काही कार्यकर्त्यांना पैसे देऊन चॅनेलवर बोलण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. शांततेत रास्ता रोको करून देखील अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर यापूर्वी केलेल्या आंदोलनात देखील केलेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले गेले मात्र पाच महिने उलटूनही हे गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत ,’ असा देखील आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे.