‘ त्या ‘ बद्दल दिलगिरी पण मागणीवर अद्यापही ठाम , एसआयटी चौकशीचे खुले आव्हान.. 

शेअर करा

एसआयटी चौकशीची मागणी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शंभर टक्के एसआयटी चौकशी करा . एसआयटी चौकशी झालीच पाहिजे असे देखील आव्हान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासकीय यंत्रणेला दिलेले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे विरोधी पक्षाचा सहभाग असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलेला होता त्यावर जरांगे पाटील यांनी चौकशीचे खुले आव्हान सत्ताधाऱ्यांना देत लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे असे हायकोर्टाने म्हटलेले आहे असे देखील स्पष्ट केलेले आहे. 

माझा समाज आज अडचणीत असताना मी रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाही असे म्हणत आजारी अवस्थेत अंतरवाली सराटी गाठणार असे देखील त्यांनी रुग्णालयाबाहेर येऊन पत्रकार परिषदेत सांगितलेले आहे. ‘ मी शेतकऱ्याचा मुलगा आहे . बोलण्याच्या ओघात माझ्याकडून आई बहिणी वरून शिवी गेली असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मात्र मी माझ्या मागणीवर अद्यापही ठाम आहे . शेवटी मी पण माणूस आहे चुका प्रत्येकाकडून होतात’ ,  असे देखील जरांगे पाटील म्हटलेले आहेत. 

मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना , ‘ मी पुन्हा अंतरवाली सराटी येथे जाणार आहे . झालेल्या सर्व घडामोडींच्या पाठीमागे गृहमंत्री असून मराठ्यांना तुम्ही संपवायला निघाला आहात का ? . बोलल्यावर तुम्हाला शब्द लागतात ना पण याला जातीयवाद नाही तर काय म्हणतात ? . अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा मांडव आणि व्यासपीठ फक्त उखडून दाखवा . आयुष्यभर जेलमध्ये राहील तुला अटक करायचे तर अटक कर ‘, असे देखील आव्हान त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा खालावली त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलेले आहे.  उपचार अर्धवट सोडून अंतरवाली सराटी इथे मनोज जरांगे पाटील निघालेले होते. 

दुसरीकडे अजय महाराज बारस्कर यांनी केलेल्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी काही उत्तर दिलेले नसले तरी अजय महाराज बारस्कर यांच्या गावातील गावकऱ्यांनी अजय बारस्कर यांच्या विरोधात ठराव संमत केलेला असून अजय बारस्कर यांच्यासोबत आमचा कुठलाही संबंध नाही. आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे या ठरावात म्हटलेले आहे. 

मनोज जरांगे पाटील यांना काल रुग्णालयात दाखल केल्यानंतर शासकीय यंत्रणेने ज्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देखील गुन्हे दाखल करत त्यांना ताब्यात घेतले त्यामुळे शासकीय यंत्रणेला अपेक्षित असलेला परिणाम दिसून आला नाही उलट मराठा बांधवांमध्ये सरकारी यंत्रणेच्या विरोधात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मराठा बांधवाना संताप दिसून येत आहे .शासकीय यंत्रणेने जरांगे पाटील यांना हलक्यात घेऊन आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न अंगलट येण्याची शक्यता आहे. मराठा बांधव मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आजही एकवटलेले दिसून येत आहेत. 


शेअर करा