लसणाच्या वाफ्यात लावली ‘ अफूची झाडे ‘ ,  महिलेने तर कहरच केला.. 

शेअर करा

महाराष्ट्रात सद्य परिस्थितीत नागरिकांना कायद्याचे काही भय राहिलेले आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील तळेगाव रोड जवळ महालक्ष्मी नगर परिसरात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत एका प्लॉटिंग मध्ये लावलेली अफूची तब्बल 1226 झाडे जप्त केली आहेत . एका महिलेसोबत एका इसमाला अटक करण्यात आलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सुशील शिवाजीराव ढमढेरे ( वय 38 ) आणि सत्यभामा सुरेश थोरात ( वय 55 राहणार महालक्ष्मी नगर शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे ) अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. महालक्ष्मी नगर परिसरात एका व्यक्तीने शेतामध्ये तर एका महिलेने घराशेजारच्या प्लॉटिंग मध्ये अफूच्या झाडाची लागवड केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांना मिळालेली होती त्यानुसार त्यांनी कारवाई केली. 

पोलीस निरीक्षक गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे , सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पानसरे यांच्या पथकाने तिथे जाऊन पाहणी केली त्यावेळी सुशील ढमढेरे याने शेतातील लसणाच्या वाफ्यात अफूच्या झाडाची लागवड केलेली होती. तिथे पोलिसांनी 66 झाडे जप्त केली तर सत्यभामा थोरात यांच्या घराची पाहणी केली तर घराच्या प्लॉटिंगमध्येच त्यांनी तब्बल ११६० अफूच्या झाडाची लागवड केलेली होती. सदर प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहेत . 


शेअर करा